मुंबई : एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची हत्या झाल्यास त्याचे पडसाद सगळीकडे उमटल्याचं आपण पाहतो पण एखाद्या कोंबड्याच्या (The Hen ) हत्येनंतर अख्खं शहर दु:खात गेल्याचं कधी पाहिलं आहे का? पण असं घडलं आहे. एका कोंबड्याच्या हत्येनंतर अख्खं शहर त्याच्या जाण्यावर शोक व्यक्त करतंय, शिवाय आरोपीला शिक्षा करण्याचीही मागणी करण्यात येतेय. अमेरिकेतील (USA) मिसिसिपीमध्ये (Mississippi) ही घटना घडली आहे. मिसिसिपीमधील एका छोट्या शहरात एका कोंबड्याची हत्या करण्यात आली, त्यानंतर एकच खळबळ उडाली. या कोंबड्याचं नाव कार्ल होतं. त्याच्या हत्येनंतर 18 हजार लोकसंख्या असलेलं हे शहर अस्वस्थ झालंय. एका पोलीस अधिकाऱ्यावर कोंबडी मारल्याचा आरोप होता. या महिला अधिकाऱ्याला शिक्षा करण्याची मागणी लोकांनी लावून धरली आहे.
कार्ल रात्रंदिवस ओशन स्प्रिंग्सच्या रस्त्यावर फिरत असे. तो पहाटे स्थानिक लोकांच्या दुकानात जायचा. हा कोंबडा खूप लोकप्रिय होता. कॉफी शॉपला जाऊन पाणी प्यायचा, फिटनेस क्लासलाही जायचा. तो इतका मनमिळाऊ होता की तो लोकांच्या फोटोत डोकावायचा अन् जाऊन फोटो काढायचा आणि शहरभर रेलिंगवर डुलकी घेताना दिसायचा. पण काही दिवसांपूर्वी तो बेपत्ता झाला होता. एक प्रकारे त्याचे अपहरण झालं होतं. महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
त्याच्या जाण्यानंतर मुलांनी कार्लच्या स्मरणार्थ प्रेमपत्रं लिहिली आणि ती संपूर्ण शहराच्या खिडक्यांमध्ये चिकटवली देखील. एका स्थानिक कलाकाराने कोंबड्याच्या स्मरणार्थ एक भित्तिचित्रही रेखाटलंय.
कार्ल जिथे राहत होता त्या टॅटू आर्टिस्टच्या पार्लरने वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं की जेव्हा तो 25 एप्रिलला त्याच्या दुकानात आला तेव्हा कार्ल कुठेही सापडला नाही. त्यानंतर अनेक दिवस तो घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू होता. 24 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता एक महिला तीन पुरुषांसह आली आणि तिला पकडून घेऊन गेल्याचं सीसीटीव्हीमध्ये उघड झालं.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी महिला केंद्र शेफर जोन्स काउंटी जुवेनाईल डिटेन्शन सेंटरमधील पोलीस अधिकारी आहे. किडनॅप केल्यामनंतर पंधरा मिनिटांनी शॅफर कार्लचा मृतदेह पार्किंगमध्ये टाकताना सीसीटीव्हीमध्ये दिसली. यानंतर शॅफरला पोलिसांनी प्राण्यांच्या क्रूरतेबद्दल नोटीस बजावली आणि त्याला नोकरीवरूनही काढून टाकलं. तिला शिक्षा करण्याची मागणी करण्यात येतेय.