पोलिसांची बाबा स्टाईलच भारी, शेतकऱ्याला मदत! फोटो व्हायरल

| Updated on: Apr 16, 2023 | 7:43 PM

नुकताच या पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात तो शेतकऱ्याचं पीक खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. पोलिस कर्मचारी शेतकऱ्याच्या मदतीसाठी पोहोचले होते त्यावेळचे हे कौतुकास्पद चित्र आहे. आमचे कर्तव्य चोख पार पाडण्याचा आमचा संकल्प आहे.

पोलिसांची बाबा स्टाईलच भारी, शेतकऱ्याला मदत! फोटो व्हायरल
Police viral photos India
Image Credit source: Social Media
Follow us on

लखनऊ: उत्तर प्रदेश पोलीस कर्मचारी त्यांच्या कर्तृत्वामुळे चर्चेत असतात. त्यांच्या कामामुळे अनेकदा सर्वसामान्य लोक त्यांचे कौतुक करताना दिसतात. नुकताच या पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यात तो शेतकऱ्याचं पीक खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. या चित्राचे सत्य समोर येताच शेतकऱ्याच्या शेतात आग लागल्याचे निदर्शनास आले आणि पोलिस कर्मचारी शेतकऱ्याच्या मदतीसाठी पोहोचले होते.

हा फोटो नुकताच उत्तर प्रदेश पोलिसांच्या फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसच्या अधिकृत ट्विटर पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, बलिया जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या पिकाला आग लागली, त्यावेळचे हे कौतुकास्पद चित्र आहे. आमचे कर्तव्य चोख पार पाडण्याचा आमचा संकल्प आहे.

या फोटोत शेतकऱ्याच्या मदतीसाठी पोलिसांनी पीक खांद्यावर घेऊन गेल्याचे दिसत आहे, जेणेकरून पिकाला आगीपासून वाचवता येईल. व्हायरल झालेल्या फोटोंपैकी एका फोटोत शेतात आग लागल्याचे दिसत आहे. त्याची आग वाढतच आहे. ज्यामध्ये एक पोलीस कर्मचारी पिकाला आगीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.