भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ट्रेन म्हणून वंदे भारत ट्रेनची ओळख झाली आहे. यामुळे ही ट्रेन आपआपल्या भागातून सुरु करण्याची मागणी वाढत आहे. नवीन तंत्रज्ञानाने बनवण्यात आलेले वंदे भारत ट्रेनचे इंजिन फेल झाल्याची घटना घडली. त्यानंतर मालगाडीचे इंजिन लावून वंदे भारत ट्रेनला नेण्यात आले. त्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांच्या प्रतिक्रिया त्या व्हिडिओवर येत आहे.
नवी दिल्ली ते बनारस जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या इंजिनामध्ये बिघाड निर्माण झाला. इटावामधील भरनथा रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबली. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परंतु त्यांना ट्रेनमधील बिघाड दूर करता आला नाही. या ट्रेनमध्ये 750 प्रवाशी होते. त्यात अनेक राजकीय नेतेही होते. ट्रेमधील प्रवाशांनी गोंधळ सुरु केला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने शताब्दी एक्सप्रेस आणि अयोध्या जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस थांबवून प्रवाशांना त्या गाड्यांमध्ये बसवण्यात आले.
3 घंटे बाद भारतीय रेलवे का पुराना इंजन आया और खराब हुई अत्याधुनिक वंदेभारत ट्रेन को खींचकर ले गया। वन्देभारत के कुछ यात्री अन्य ट्रेनों से भेजे गए। वन्देभारत में खराबी के चलते AC भी नहीं चल पाया। इससे हजारों यात्री परेशान हुए।#Etawah #TRAIN https://t.co/0cSd9fFuCe pic.twitter.com/HNmZ12zLFW
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 9, 2024
वंदे भारत ट्रेन बराच वेळ भरनथा येथे पडून होती. अखेर तिला नेण्यासाठी मालगाडीचे इंजिन बोलवण्यात आले. त्यानंतर ती गाडी नेण्यात आली. सोशल मीडियावर वंदे भारतला मालगाडीचे इंजिन नेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया सुरु झाल्या आहेत.
दिल्ली से वाराणसी जा रही वंदेभारत एक्सप्रेस ट्रेन इटावा (UP) में पिछले डेढ़ घंटे से खड़ी है। बताया जा रहा है कि इस ट्रेन का इंजन फेल हो गया है। इस वजह से कई और ट्रेनें जहां-तहां रुक गई हैं। pic.twitter.com/HLkgGzPO7I
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 9, 2024
काही युजरने म्हटले नवीन टेक्नोलॉजीच्या वंदे भारतला जुन्या मालगाडीचे इंजिन नेते आहे. अखेर जुने ते सोनेच असते. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, जुने शंभर दिवस तर नव्याचे नऊ दिवस. प्रयागराज विभागाचे जनसंपर्क अधिकारी अमित सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, सोमवारी सकाळी नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस क्रमांक 22436 च्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन बंद पडल्यावर 10:24 वाजता एक रिलीफ इंजिन तेथे पोहोचले आणि ट्रेन दुसऱ्या स्टेशनवर आणण्यात आली.