व्हायरल गर्ल वंशिकाचं अखेर पॅचअप झालंय. तिचे आणि आकाशचे फोनवर बोलणे झाले आहे. या स्टोरीचा तिसरा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात हे दोघे पुन्हा कसे बोलले हे ऐकायला मिळतंय. वंशिकाने स्वतः आकाशला फोन करून त्याची आठवण येत असल्याचे सांगितले. यानंतर या दोघांनीही भेटण्याचा बेत आखला आहे.
वंशिका नावाची एक मुलगी मैत्रिणीला फोन करून तिच्या ब्रेकअपची दु:खद कहाणी सांगत होती आणि ती गोष्ट प्रचंड व्हायरल झाली. दोन दिवस वंशिकाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
यानंतर वंशिकाच्या आरोपांना तिचा बॉयफ्रेंड आकाशनं स्वतः उत्तर दिलं आणि मग काय आकाशचा व्हिडीओ व्हायरल झाला.
दोघांचेही फोन ऐकून असं वाटत होतं की आता हे दोघेही एकमेकांशी कधीही बोलणार नाहीत. आता मात्र या दोघांचाही एकमेकांशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. लोक आता या व्हिडीओवर चर्चा करत आहेत.
वंशिकाने स्वत: आकाशला फोन करून तु नंबर डिलीट का केला, अशी विचारणा केली. यानंतर दोघांनीही आपल्या मित्रांमुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं आणि त्यांच्यामुळे ते दोघंही व्हायरल झाल्याचं सांगितलं.
वंशिका म्हणाली की तिला त्याची आठवण येत आहे. शेवटी दोघांनीही आता भेटीचा बेत आखलाय. या तीन व्हिडिओंची पुष्टी झाली नसली, तरी ती प्रचंड व्हायरल होत आहेत.