मुंबई : आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की त्यांच्यातील कलाकारी पाहून आपण थक्क होऊन जातो. आपण कधी कल्पनाही न केलेला एखादा माणूस काहीतरी भन्नाट अशी कामगिरी करुन दाखवतो. नंतर याच माणसाची सगळीकडे चर्चा होते. असे अनेक किस्से तुम्ही या पूर्वी पाहिले असतील. सध्या असाच एक किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. बनारसच्या घाटावर भीक मागून खाणारी एक महिला फाडफाड इंग्रजी बोलत आहेत. विशेष म्हणजे ती सर्वांना मदतीचे आवाहन करतेय. या महिलेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बंगळुरु येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेने कॉम्यूटर सायन्समधून पदवीचे शिक्षण घेतेलेले आहे. तिला इंग्रजीमध्ये चांगल्या प्रकारे बोलता येतं. मात्र शरीराचा डावा भाव पॅरालाईज झाल्यामुळे ती अधू झालीय. तिच्यावर बनारसच्या घाटावर तसेच रस्त्यावर बसून पोटाची खळगी भरण्याची वेळ आलीय. हा व्हिडीओ फेसबुकवर Sharda Avanish Tripathi या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलेने साऊथ इंडियामधून पदवीचे शिक्षण घेतलेले आहे.
पाहा व्हिडीओ :
व्हायरल होत असलेली महिला सर्वांना मदत करण्याचे आवाहन करत आहेत. या महिलेचे मानसिक संतूलन बिघडलेले असावे, असे सुरुवातीला वाटते. मात्र या महिलेले नोकरीची गरज आहे. तसेच ती पदवीधर असल्यामुळे ती मला मदत करा असे आवाहन करत आहेत. कल्पना नसतानाही ही महिला इंग्रजीत बोलू लागल्यामुळे नेटकरी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत आहेत. काही क्षणात या व्हिडीओला फेसबूकवर 50 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
इतर बातम्या :