Video : चित्रा वाघ यांनीच सुसाईड नोट लिहायला लावली, पीडितेचा गंभीर आरोप
मदत म्हणजे त्यांना माझं काही पडलेलं नाही. त्यांचा जो काही रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर आहे. त्यामुळे त्या माझ्याकडून अगदी तक्रारीपासून सगळ्या गोष्टी म्हणजे रघुनाथ कुचिक यांचा पीआरओ रोहित पिसे म्हणून आहे. तो सगळी माहिती म्हणजे ते कुठे राहतात, त्यांची फॅमिली काय? आनंद घरत म्हणून असाही एक व्यक्ती आहे. हे सगळे मिळून त्यांची सगळी […]
मदत म्हणजे त्यांना माझं काही पडलेलं नाही. त्यांचा जो काही रोख आहे तो रघुनाथ कुचिक यांच्यावर आहे. त्यामुळे त्या माझ्याकडून अगदी तक्रारीपासून सगळ्या गोष्टी म्हणजे रघुनाथ कुचिक यांचा पीआरओ रोहित पिसे म्हणून आहे. तो सगळी माहिती म्हणजे ते कुठे राहतात, त्यांची फॅमिली काय? आनंद घरत म्हणून असाही एक व्यक्ती आहे. हे सगळे मिळून त्यांची सगळी माहिती ते अंकल आणि चित्रा वाघ यांना पाठवतात. त्यातून मग पुढील सगळ्या गोष्टी घडत गेल्या, असं पीडित तरुणी म्हणाली. त्यावेळी चित्रा वाघ यांनी तक्रार करण्यासाठी तुझ्यावर दबाव आणला का? असा प्रश्न विचारला असता, चित्रा वाघ म्हणण्यापेक्षा या सगळ्यांनीच माझ्यावर दबाव आणला. जोपर्यंत मी रघुनाथ कुचिक यांच्यासोबत होते, माझी सगळी अबॉर्शन प्रोसेस सुरु होती, तोपर्यंत सगळं ठीक होतं. कारण मी त्यांना विरोध करुन आले होते. त्यानंतर मी प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात नव्हते. पण मला वारंवार फोन करुन परत यायला सांगत होते. त्यांच्याविरोधात तक्रार करायला सांगत होते. हे सगळं ते अंकल सांगत होते आणि त्यांनीच हे सगळं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना सांगत होते, असं पीडित तरूणीने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.