एका कोंबड्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
Ad
व्हायरल व्हिडीओ
Image Credit source: twitter
Follow us on
दिल्ली : पूर्वी पहाटे (Morning) उठण्यासाठी कोणताही गजर लावण्याची गरज नव्हती. कोंबडा (Cock) आरवला की त्या आवाजाने लोक उठायचे. मात्र, शहरातली परिस्थिती वेगळी आहे. शहरात (City) सिमिटांच्या जंगलामुळे लोकांना राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पाळीव प्राणी पाळण्याचा प्रश्नच येत नाही. माणसांना रहायला जागा नाही. त्यामुळे कोंबडे काय चिमण्याही दिसेनाशा झाल्या आहेत. मात्र, आजही ग्रामीण भागात कोंबडे, बकरे असे पाळी प्राणी पाळताना दिसून येतं. ग्रामीण भागातील लोक आजही पाळीव प्राणी पाळतात. पशुपालन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दिसून येतं. अलिकडेच एका कोंबड्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ (Viral Video) कोंबडा आरवताना असला तरी याचं कारण थोडं वेगळं आहे. मात्र, हा कोंबडा ज्याप्रकारे आरवतो आहे. ते पाहून तुम्ही खळखळून हसाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मोठ्याने वेगळ्याच प्रकारे आरवतो आहे. जणू काही हा कोंबडा एका श्वासात आरवतो आहे, असं यातून दिसून येतंय. त्यानंतर हा कोंबडा इतका मोठा श्वास घेतो की नंतर थेट खाली कोसळतो. हा व्हिडीओ खरोखरंच खूप हसवून जातो. तुम्ही हे वर्णन ऐकल्यावर हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल.
इतका रंजक हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर चांगलंच या व्हिडीओला पसंत करण्यात आलंय.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी तर ग्रामीण भागातील राहण्याच्या पद्धतीवर आणि मोकळ्या वातावरणावरही भाष्य केलंय. तर कुणी या व्हिडीओचा प्रचंड आनंद लुटलाय. अनेकांनी बऱ्याच दिवसानंतर हसल्याचं देखील कमे्ट्सच्या माध्यमातून सांगून दाखवलंय. तर कुणी हे आरवनं कोंबड्यानं गंमतीशीर चित्रपट पाहिल्यानंतर केल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे या व्हिडीओ चांगलेच लाईक्स आहेत. प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा देखील आहे. सोशल मीडियावर सध्या अशाच प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतायेत. विशेष म्हणजे अशा व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात पाहिलं देखील जातं. तरुण मंडळी इन्स्टाग्रामवर अशा व्हिडीओना शेअर करतात. त्यामुळे या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स देखील मिळतात. याचे व्ह्यूस देखील वाढतात.