तुम्ही कधी तुमच्या नजरेसमोर एखाद्याला हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आलेला पाहिलाय का? जर आलाच तुमच्यासमोर तर? काय कराल? आपण काय डॉक्टर नाही त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव सगळ्यांना आहे. एखाद्याला हृदय विकाराचा झटका यावा आणि डॉक्टर (Doctor) समोरच असावा अशी इच्छा प्रत्येकजण ठेवेल. किती छान ते नशीब असावं पण इतक्या इमर्जन्सीच्या काळात (Emergency) समोरच डॉक्टर! असाच एक व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येतो आणि समोरच डॉक्टर असतो.
व्हिडीओ बघा फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका येता येता राहिलाय. एक व्यक्ती डॉक्टरांकडे आलेला असतो. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतं की रोजच्याप्रमाणे दवाखान्यात काम सुरु असतं.
डॉक्टर आलेले पेशंट तपासात असतात. समोर दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. बाजूला एक महिला पेशंट आहे. समोर निळा शर्ट घालून बसलेल्या एका व्यक्तीला काही वेळानं हृदय विकाराचा झटका येतो.
व्हिडीओ बघताना पटकन ही गोष्ट लक्षात येत नाही. जेव्हा डॉक्टर उठून पेशंट जवळ जातात तेव्हा ते व्हिडिओत दिसून येतं.
This video shows an example of a real life hero living in our midst. Dr. Arjun Adnaik, one of the best cardiologists, from Kolhapur saving a patient’s life. I applaud such honourable and virtuous heroes. pic.twitter.com/Gd9U2ubldJ
— Dhananjay Mahadik (@dbmahadik) September 5, 2022
रुग्णाची हालचाल दिसताच डॉक्टर तातडीने खुर्चीवरून उठून प्राथमिक उपचार करून त्यांचे प्राण वाचवतात. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडिओ पाहून सर्वजण या डॉक्टरचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
“हा व्हिडिओ म्हणजे खऱ्या आयुष्यातील हिरो आपल्यामध्ये राहत असल्याचे उदाहरण आहे. कोल्हापूरच्या उत्तम हृदयरोगतज्ज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. अर्जुन अडनाईक यांनी एका रुग्णाचे प्राण वाचवले. अशा रिअल लाइफ हिरोंचं जेवढं कौतुक होईल, तितकं कमीच.” असं कॅप्शन टाकत खासदार धनंजय महाडिक यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केलाय.
क्लिनिकमध्ये बसूनच त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णाची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांना दिसताच त्यांनी तातडीने खुर्चीवरून उठून प्राथमिक उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडिओ पाहून सर्वजण या डॉक्टरचं कौतुक करत आहेत.