Video : तिकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती, अन् फॅमिली मॅच पाहात होती

| Updated on: Jul 02, 2024 | 4:21 PM

मृत नातेवाईकांचे पार्थिव कॉफिनमध्ये ठेवले होतं. आणि कुटुंब रंगदार स्थिती सुरु असलेली मॅच पाहण्यात बिझी असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला खूप पाहीले जात आहे.

Video : तिकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती, अन् फॅमिली मॅच पाहात होती
family watching match
Follow us on

जेव्हा घरात कोणा व्यक्तीच्या अंतिम संस्काराची तयारी सुरु असते. तेव्हा घरातील व्यक्ती दु:खात बुडालेल्या असतात. घराला सुतकी अवकळा आलेली असते. लोक प्रिय व्यक्तीच्या जाण्याने रडत असतात. एकीकडे आक्रोश सुरु असल्याने तर दुसरीकडे मृताचे नातेवाईक लवकर अंतिमसंस्कार व्हावेत म्हणून घाई करीत असतात. म्हणजे त्यांना हे सोपस्कार लवकर आटोपण्याची घाई लागलेली असते. बाहेरगावाहून आलेली सर्व मंडळी कातावलेली असतात. आणि घरातील मंडळी दु:खाने आक्रोश करीत असतात अशी विचित्र स्थिती घरात असते. परंतू एका विचित्र घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कोपा अमेरिकन सॉकर फूटबॉल मॅच

एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अंतिम संस्काराची तयारी एकीकडे सुरु आहे तर दुसरीकडे लोक मॅच पाहात आहेत. या मॅचमध्ये टेलिव्हीजनवर चिली आणि पेरु दरम्यान खेळला जाणारा कोपा अमेरिकन सॉकर फूटबॉल सामना रंगतदार स्थितीत पोहचली होती. त्यांनी घरात मोठ्या स्क्रिनवर प्रोजेक्टरवर हा सामना पाहण्याची तयारी केली होती. मृत नातेवाईकांचे पार्थिव कॉफिनमध्ये ठेवले होतं. आणि फुटबॉल मॅच सुरु असल्याने ती पाहण्यात सर्व फॅमिली बिझी असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. म्हणजे अंत्यसंस्कारातून ब्रेक घेऊन उत्कंटावर्धक मॅच पाहण्यात सर्वजण बिझी होते. हा व्हिडीओ चांगलात व्हायरल होते.

येथे पाहा व्हिडीओ –

सोशल मीडियावर यूजर्सनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.  हे कुटुंब टेलिव्हिजनवर चिली आणि पेरू यांच्यातील कोपा अमेरिकन फूड बॉल लीगचा सामना पाहत होते. या मॅचसाठी त्यांनी मोठ्या स्क्रीनवर प्रोजेक्टर बसवला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांच्या मृत नातेवाईकाची शवपेटीही शेजारी ठेवली होती. हे कॉफीन पांढऱ्या फुलांनी सजविलेले होते. फुटबॉल खेळाडूंच्या जर्सींनी सजवली होती. शवपेटीजवळ प्रार्थना कक्षात एक पोस्टरही लटकलेले दिसत आहे. ज्यावर लिहिले आहे की, ‘अंकल फॅना, तुम्ही आमच्या सोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांसाठी तुमचे आभार’ धन्यवाद. आम्ही तुमची आणि तुमच्या कोंडोरियन कुटुंबाच्या स्मृती कायम जतन करु.’ असे मोरक्कन वर्ल्ड न्यूजच्या बातमीत म्हटले आहे.