मुंबई : सोशल मिडीयावर एका भन्नाट चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एखादा स्पायडरमॅन चित्रपटातील दृश्य पहायतो की काय असा भास हा व्हिडीओ पाहून आपल्याला येत आहे. हा सराईत चोर काही क्षणात उंच इमारतीच्या गच्चीवर जाऊन पुन्हा झर झर खाली उतरताना या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. या चोराची कला पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इतका हा इमारतीची उभी भिंत चढण्यात तरबेज आहे.
व्हिडीओच्या सुरूवातीला एका खिडकीतील व्यक्तीची नजर या चोरावर पडते. तो या चोराचा लागलीच व्हिडीओ तयार करतो. त्याच्या खिडकीसमोरील इमारतीच्या गच्चीपर्यंत झर…झर…हा चोर लिलया चढत जातो. हा व्यक्ती त्या चोराचा व्हिडीओ बनवताना त्याला आवाजही देत आहे. त्यामुळे पुन्हा मोठ्या स्फूर्तीने हा चोर पुन्हा या इमारतीवरुन तितक्याच वेगाने झरझर खाली उतरताना दिसत आहे.
Verbal kalesh over thief climbing and Descending 4floor under 50seconds in West Delhi pic.twitter.com/0nLbDhRJwM
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 7, 2023
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटरवर हा व्हिडीओ@gharkekalesh या अकाऊंटवरून शेअर झाला आहे. केवळ 53 सेंकदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 29 हजार 600 युजरनी पाहील्याचे दिसत आहे. युजर हा व्हिडीओ पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रीया देत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘किती मस्त फिटनेस आहे चोराचा, अन्य एका युजरने प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, ‘आम्ही दिल्लीवाले कधी सुधरणार नाही’ तर तिसऱ्या युजरने म्हटले आहे की चोर आहे की स्पायडर मॅन !