मुंबई : ‘जहां चार यार मिल जाएं वही रात हो गुलजार’ हे माणं तर तुम्ही ऐकलंच असेल. याचा अर्थ असा की जिथे चार मित्र एकत्र येतात तिथे आनंदी आनंद असतो. हल्लीच्या धकाधकीच्या जिवनात मित्रांसोबत काही वेळ एकत्र घालवणं थोडं कठीण होऊन बसलं आहे. मात्र, काही लोक असेही असतात जे रोज आपल्या मित्राला भेटल्याशिवाय त्यांचा दिवस पूर्ण होऊ शकत नाही. असे लोक मित्रांसोबत वेळ घालवतात, मजामस्ती करतात. अशाच काही मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) धुमाकुळ घालतोय. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, तो खूप मजेशिर आहे. या व्हिडीओमध्ये मित्रांचा ग्रुप (Friends Group) जे काही करत आहे ते पाहून तुम्ही पोट धरुन हसल्याशिवाय राहणार नाहीत.
एखाद्या मॉलमध्ये, रेल्वे स्टेशनवर किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी तुम्ही एक्सेलेटर अर्थात स्वयंचलित शिडी नक्कीच पाहिली असेल. अशा प्रकारची शिडी तुमच्यासाठी खूप सोयिस्कर ठरते. कारण त्या शिडीवर तुम्हाला चालावं लागत नाही. मात्र, तुम्ही आपोआप वरील किंवा खालच्या मजल्यावर पोहोचता. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एस्केलेटर दिसत असून, त्यावर मित्रांचा एक ग्रुप मजामस्ती करताना पाहायला मिळत आहे.
Men will be men ? pic.twitter.com/wEhh8eZ1ef
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 26, 2021
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मित्रांचा हा ग्रुप एस्केलेटरवर बसून ‘नाव’ चालवताना दिसत आहे. ते खूप मजामस्ती करताना दिसत आहेत. त्यांच्यासह आजूबाजूचे दुसऱ्या एस्केलेटरवरुन जाणारे लोकही हसत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी हा मजेदार व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 19 हजारापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर शेकडो लोकांनी तो लाईकही केलाय.
अनेकांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर मजेशिर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘मजामस्ती करण्यासाठी आणि कुठल्याही गोष्टीचा आनंद घेण्यासाठी मित्रांची गरज असते’. एक यूजर म्हणतो की, ‘जेव्हा मित्र एकाच नावेवर असतात तेव्हा प्रत्येक क्षण स्वर्गाप्रमाणे भासतो’. तर एकाने ‘पता नहीं जी कौन सा नशा करते हैं’, अशी मजेशिर कमेंट केलीय.
इतर बातम्या :