अनेकदा प्राण्यांचे गोंडस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या स्मिथसोनियनच्या राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचा एक व्हिडिओ लोकांची मने जिंकत असतात. ज्यात एक बेबी पांडा पाण्यात मजा करताना दिसत आहे. जर तुम्हाला पांडाचे व्हिडिओ पाहायल आवडत असेल, तर तुम्हाला झिओ क्यू जी नावाच्या पांडाबद्दल चांगलंच माहिती असेल. हा बेबी पांडा इंटरनेटवरील कोणत्याही सेलेबपेक्षा कमी नाही. ( Video of baby panda playing in the water goes viral)
या गोंडस पांडाचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. तसे, या पांडाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाला त्याचे बालपणही आठवते. असे बरेच लोक असतील ज्यांनी बालपणात घसरगुंडी खेळण्याचा आनंद घेतला असेल. बेबी पांडाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच काहीतरी पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये बेबी पांडा पाण्यात लोळताना आणि उड्या मारताना दिसतो आहे.
चला आधी हा व्हिडिओ पाहू
पांडाचा हा गोंडस व्हिडिओ इंस्टाग्रामवर smithsonianzoo नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना, बर्ड हाऊसने कॅप्शनमध्ये लिहिले, जायंट पांडाने वेळ घालवण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. प्राणीसंग्रहालयाचे केअरटेकर्स अंगण स्वच्छ करत असताना, बेबी पांडा जिओने स्प्रेजवळ उडी मारली. या दरम्यान त्याने खूप मजा केली आणि चांगला वेळ घालवला.
सुमारे एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 2 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ही संख्या सतत वाढत आहे. सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहलं की, हे खूप गोंडस आहे, मला दिवसभरही याला पाहायला आवडेल. त्याचवेळी, दुसऱ्याने लिहिले आहे, पाण्यात मजा करताना पांडा किती गोंडस दिसतो आहे.