भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे परदेशी मुली सून म्हणून इथे राहायला येतात. हे असं प्रेम सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपल्याला पाहायला मिळालंय. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जर्मनीची एक सून भारतातील एका गावात शेतीत कांदा पेरत आहे. हा व्हिडीओ जुना आहे पण तो पुन्हा व्हायरल होतोय.
खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही परदेशी सून देशी स्टाइलमध्ये शेतात कांदा पेरताना दिसत आहे.
या विदेशी महिलेने भारतीय कपडे घातले असून सिंदूर सुद्धा लावलेलं आहे. ती शेतात आरामात बसून कांदा पेरत आहे. तिला शेतात काम करताना पाहून एक माणूस व्हिडिओ बनवू लागतो आणि तिला काहीतरी विचारू लागतो.
व्हिडिओ बनवणारी व्यक्ती बहुधा या मुलीच्या सासरकडची असावी. “मी तुला काही विचारू का” असं तिनं विचारलं, त्यावर ती हिंदीत ‘हो नक्की’ असं म्हणते.
त्यानंतर तो माणूस तिला ‘तू कुठून आली आहेस’ असे विचारतो, त्यावर ती ‘मी जर्मनीची आहे’ असे म्हणते आणि “इथल्या शेतात कांदा लागवड करतीये” असं सांगते.
तेव्हा तो माणूस म्हणतो की ‘तुम्ही जर्मनीहून भारतात कांदा लावण्यासाठी आला आहात. यानंतर ती महिला हसू लागते.
या दरम्यान दूर उभ्या असलेल्या परदेशी सुनेची सासू हसत-खेळतांना दिसते. महिलेच्या सासूबाईंची प्रतिक्रियाही पाहण्यासारखी आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते आपला फीडबॅकही देत आहेत.