VIDEO : रस्त्याच्या कडेला विजेच्या वेगाने धावताना दिसले माकड, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, ‘पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक नक्कीच जिंकणार’

| Updated on: Jan 02, 2022 | 8:36 AM

माकडे कशा उड्या मारतात आणि या घराहून त्या घरावर कसे जातात. हे आपल्याला माहीतीच आहे. याच कारणामुळे माकडांना देखील सर्वात खोडकर, चपळ आणि बुद्धिमान प्राणी मानले जाते. अनेकदा विविध प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांना खूप आवडतात.

VIDEO : रस्त्याच्या कडेला विजेच्या वेगाने धावताना दिसले माकड, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले, पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक नक्कीच जिंकणार
माकड
Follow us on

मुंबई : माकडे (Monkey) कशा उड्या मारतात आणि या घराहून त्या घरावर कसे जातात. हे आपल्याला माहीतीच आहे. याच कारणामुळे माकडांना देखील सर्वात खोडकर, चपळ आणि बुद्धिमान प्राणी मानले जाते. अनेकदा विविध प्रकारच्या प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माकड उसेन बोल्टप्रमाणे पळताना दिसत आहे. माकडाचे हे पळणे पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

माकडाच्या रनिंगचा व्हिडीओ व्हायरल

हा मजेदार आणि धोकादायक व्हिडीओ आहे. कारण यामध्ये थोडीही चूक झाली असती तर माकडे बिचारे सरळ खड्यामध्ये पडले असते. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक माकड रस्त्याच्या बाजूने खूप वेगाने धावते आहे. या व्हिडिओतील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो पळण्यासाठी आपले चार पाय वापरत नसून तो माणसांप्रमाणे धावताना दिसत आहे. माकड दोन पायांवर धावत आहे जणू एखाध्या माणूसच धावत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, हा माकड पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकेल.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘लक्ष देऊन पळ पडू नकोस.’ हा व्हिडिओ @naturelovers_ok नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 5 लाख 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच बरेच यूजर या व्हिडीओला लाईकही करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या : 

Video : सेंच्युरियनमधील विजयानंतर विराट कोहली, राहुल द्रवीडचा हा भन्नाट डान्स व्हायरल

Video | वाघ तो वाघच! Mahindra Xyloला दातांनीच ओढलं, आनंद महिंद्रांना का नवल नाही वाटलं?