उत्तर प्रदेश : देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची (Five State Election) रणधुमाळी सुरू आहे. अशातच नेहा सिंह राठोड (Neha singh rathore Video) यांच्या अकाऊंटवरू यूपीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. यूपी मे का बा…? (Up mai ka ba) असं टायटल या व्हिडिओला देण्यात आला असून हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करण्यात आलाय. यातून मोदींना आणि भाजपला टोलेबाजी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता आणण्यासाठी योगी आदित्यनाथ आणि भाजप पूर्ण जोर लावत आहे. आधीच डझनभर नेत्यांनी साथ सोडल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तर इतर राजकीय पक्षही जोमाने निवडणूक मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रोज एकमेकांवर राजकीय आरोप सुरू आहेत. उमेदवारांची फोडाफोडी सुरू आहे. उत्तर प्रदेशातील जनतेला आपल्याकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न या सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय.
देशात वाढलेली बेरोजगारी यावरून या व्हिडिओ तोंड भाजप आणि मोदी सरकारला टोलेबाजी करण्यात आलेली आहे. कोरनाकाळात गंगा नदीत जी प्रेतं तरंगत होती त्यावरून ही मोदी सरकारला टोलेबाजी करण्यात आली आहे. कोरोनामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले त्यांची प्रेत गंगेत तरंगत होती असा उल्लेख या व्हिडिओत करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने शेतकऱ्यांवरती गाडी चढवलेली. त्यावरून ही या व्हिडिओत टोलेबाजी करण्यात आली आहे. मंत्र्याच्या बेट्याचा तोरा मोठा शेतकऱ्यांच्या छाताडावर चढवली गाडी, असे म्हणत या व्हिडिओतून टीका करण्यात आली आहे.ओ चौकीदार म्हणत याला कोण जबाबदार? असा सवाल या व्हिडिओतून पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला आहे. यूपी मे का बा? राम राज की झाकी है, काशी, मथुरा बाकी असेही या व्हिडिओत बोलण्यात आले आहे. गोरखपुर येथे झालेल्या हिंसाचारावर या व्हिडिओत टोमणे मारण्यात आले आहेत.
यू पी में का बा..!#नेहासिंहराठौर #UPMEKABA #UPELECTION2022#विधानसभाचुनाव2022 https://t.co/TWMAiW3gqH pic.twitter.com/bf4mej4mMy
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) January 16, 2022
यूपीत जय श्री रामाचा जप सुरू आहे आणि अशावेळी भ्रष्टाचारही सुसाट आहे सर्वजण पैसे खायलाच बसलेत असेही या व्हिडिओत म्हटलं झाले आहे. मंदिर-मशीद लढाईमध्ये उत्तर प्रदेशचा विकास मागे राहील याची टोलेबाजी या व्हिडिओतून करण्यात आली आहे. या व्हिडिओच्या शेवटी जिंदगी झंडवा फिर भी घमंड वा असेही म्हटल्या झाले आहे. येत्या काही दिवसात उत्तर प्रदेशात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल. अशा वेळी सर्वच राजकीय पक्ष करून सोशल मीडियाद्वारे ही प्रचार जोरदार करण्यात येतोय. त्यामुळे हा व्हिडिओ सध्या चांगलाच वायरल होतोय. सोशल मीडियावर सध्या याच व्हिडिओ ची हवा आहे. या व्हिडिओतून मांडलेल्या मुद्द्यांचा निवडणुकीचा निकाल कसा आणि किती परिणाम होतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.