ऑक्टोपस तुम्ही पाहिलाच असेल. बघायला विचित्र वाटतं, कारण त्यात एक-दोन नाही तर एकूण 8 हात आहेत आणि ते हातही खूप लांब आहेत. ऑक्टोपसबद्दल जरी सर्वांनाच माहिती असलं तरी या व्यतिरिक्त पृथ्वीवर असे अनेक जीव आहेत, जे त्यांच्या विचित्र पोतामुळे लोकांना आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर अशा विचित्र प्राण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो ऑक्टोपससारखा दिसतो, पण प्रत्यक्षात तो ऑक्टोपस नाही, कारण त्याला फक्त 5 हात आहेत आणि त्याच वेळी त्याचे हात सापासारखे दिसतात. हा प्राणी असा आहे की, सुरुवातीला कोणीही घाबरणार नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने या विचित्र प्राण्याला आपल्या हातावर ठेवले आहे, जो हळूहळू रेंगाळत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे अजून बरेच लोक उपस्थित होते, जे हे दृश्य पाहत होते. कदाचित असा प्राणी त्यांनी कधी पाहिला नसेल. असा प्राणी तुम्ही कधी पाहिला आहे का?
बहुधा पाहिला नसेल. खरं तर या विचित्र दिसणाऱ्या प्राण्याचं नाव आहे ब्रिटल स्टार्स (Brittle stars). हा एक सागरी प्राणी आहे, जो सर्वत्र दिसत नाही. त्यामुळेच लोक याला ‘रहस्य’ किंवा विचित्र प्राणी मानतात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर beautiful_new_pix नावाच्या आयडीसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.
त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी ‘हा कोणता जीव आहे’, असं विचारतंय, तर कुणी ‘आजवर असा कुठलाही प्राणी पाहिला नाही’, असं म्हणतंय.