दुचाकी एक, माणसे अनेक! कुत्रे, कोंबड्या, माणसे…Viral Video

| Updated on: Oct 10, 2023 | 4:39 PM

हा व्हिडीओ खूप व्हायरल झालाय. एका बाईकवर अनेक लोकं बसलेले आहेत. व्हिडीओ बघून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एका गाडीवर लहान मुलं आहेत, कुत्रे आहेत आणि कोंबड्या सुद्धा आहेत. एवढं सगळं एकाच गाडीवर हा माणूस घेऊन चाललाय. असे अनेक व्हिडीओ याआधी सुद्धा आपण पाहिलेत. पण हा व्हिडीओ जरा हटके आहे.

दुचाकी एक, माणसे अनेक! कुत्रे, कोंबड्या, माणसे...Viral Video
viral video
Follow us on

मुंबई: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे खूप मजेदार असतात. रोज एक व्हिडीओ नव्याने व्हायरल होतो. सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी हे व्हिडीओ प्राण्यांचे असतात, कधी पक्ष्यांचे तर कधी अजून कशाचे. या व्हिडीओमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात. लोकांना जर हे व्हिडीओ आवडले तर ते शेअर सुद्धा करतात. हे व्हिडीओ इतके मजेदार असतात की बास्स. तुम्ही बाईक राइडचे पण खूप व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ अनेक पद्धतीचे असतात. आता हाच व्हिडीओ बघा, या व्हिडीओमध्ये एका बाईकवर असंख्य मुलं बसलेली आहेत. दोन कुत्रे आणि कोंबड्या सुद्धा आहेत.

कोंबड्या दिसतात, कुत्रे दिसतात

पुढच्या पेट्रोलच्या टाकीवर दोन मुले, मध्ये नवरा बायको, मागे दोन मुले, कुत्रे, कोंबड्या असा सगळा लवाजमा घेऊन हा बाईकस्वार चाललाय. हा व्हिडीओ खूप मजेशीर आहे. व्हिडीओ बघताना वाटतं की एका गाडीवर नेमके किती लोकं बसलेले आहेत? जसजसा व्हिडीओ पुढे जातो आपल्याला कळत जातं की एका गाडीवर खूप लोकं आहेत. हळूहळू आपल्याला कोंबड्या दिसतात, कुत्रे दिसतात. एवढं सगळं बघून आपल्याला सुद्धा चक्रावल्या सारखं होतं.

व्हिडीओ व्हायरल

ही क्लिप बघून नेटिझन्स खूप हैराण झालेत. सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. एक बाईक आणि ७ माणसे आहेत. दोन कुत्रे, कोंबड्या असं सगळंच एका गाडीवर आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे हे समजू शकलेलं नाही. पण व्हिडीओ बघताना सगळेच हैराण झालेत हे मात्र नक्की. याआधी सुद्धा अनेक असे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. कधी एका रिक्षात खूप लोकं बसलेले दिसतात तर कधी अजून काही दिसतं. एकूण ट्राफिकचे नियम बघता आपल्याकडे तरी असं होऊ शकत नाही हे तुमच्या लक्षात येईल. या व्हिडीओवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिलीये.