एक काळ #JCB_की_खुदाई (JcbKiKhudai) या ट्रेन्डनं गाजवलाय. त्याला कारणं अनेक आहेत. पण आता #JCBच्या खुदाईचा काळ मागे सरलाय. 2021 संपत आलंय. वेळ कुणासाठी थांबत नाही. ती चालत राहते. जेसीबीच्या बाबतीतही तेच झालंय. एकेकाकी खुदाईसाठी ट्रेन्ड होणाऱ्या जेसीबीचा आता एक नवा आणि भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे. यात जेसेबीच्या खुदाईऐवजी जेसीबीची पिटाई होत असल्याचं दिसून आलंय.
दोन बुलडोजर जेसीबीवर हल्ला करत असल्याचं दिसून आलंय. हा व्हिडीओ एखाद्या कंन्स्ट्रक्शन साईटवरचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या व्हिडीओत जेसीबी खरंतर खुदाईच करत होता. पण दोन बूलडोजर त्याला काम करण्यापासून रोखत असल्याचं दिसून आलंय.
भांडण करण्यासाठी कारण फार महत्त्वाचं नसतं. भांडण कशावरुनही होऊ शकतं. आता जेसीबीविरोधात दोन बुलडोझर का उभे ठाकलेत, हा प्रश्न अनेकांना पडलाय. कदाचित ज्या बांधकामाच्या ठिकाणी हा प्रकार सुरु आहेत, तिथलं काम थांबवण्यासाठी बुलडोझरच्या मदतीनं जेसीबीला रोखण्याचा प्रयत्न झाला असावा, असा अंदाज काहींनी बांधलाय. पण एकंदरीतच जेसीबी आणि बुलडोजरमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं या व्हिडीओत दिसून आलंय.
bridlove_store नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी या व्हिडीओतील भांडणाची तुलना WWEसोबत केली आहे. तर काहींनी या व्हिडीओतून जेसीबीची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पाडलाय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, हे काही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र लोकं या व्हिडीओची सोशल मीडियात चांगलीच मजा घेताना पाहायला मिळालेत.
Shocking Video | भरधाव रेल्वेची गायीला जोरदार धडक! पण देव तारी त्याला कोण मारी, पाहा नेमकं काय घडलं?
Video : लग्नातच नवरदेवाची नवरीकडून धुलाई, काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ
Video : सिगारेट ओढणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच, सिगारेट सोडून द्याल
Video: आधी मोदी आणि आता अमित शाह, सुजय विखे पुन्हा पुन्हा फ्रेममध्ये का येतात? का हटवले जातात?