मुंबई : रस्त्यावर भरधाव वेगानं गाडी चालवणारे अनेकदा पोलिसांना गुंगारा देत रस्त्या बदलताना पाहायला मिळतात. त्यामुळेच सोशल मीडियावर (Social Media) ट्राफिक पोलिसांच्या (Traffic Police) कारवाईचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कारवाई दरम्यान अनेकदा पोलीस अशा लोकांवर कारवाई करण्यात यशस्वी होतात. तर अनेक वेळा असे लोक पोलिसांना चकमा देऊन पळून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘पापा की परी’ पोलिसांना गुंगारा देऊन जाताना पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी एक पोलीस कर्मचारी गाडी पकडण्याच्या नादात जमिनीवर पडल्याचंही दिसून येत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर चेंकिग सुरु आहे. त्यावेळी एक पोलीस कर्मचारी मुलीला थांबण्याचा इशारा करतो. मात्र, ती मुलगी पोलिसांना पाहून न पाहिल्यासारखं करत पुढे निघून जाते. त्याचवेळी दोन पोलीस कर्मचारी तिचा पाठलाग करत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्या मुलीला थांबवण्यात ते दोघेही यशस्वी होत नाहीत. एक पोलीस कर्मचारी स्कुटीला मागे पकडतो. त्यावेळी ती तरुणी गाडीचा वेग वाढवते. त्यामुळे तो पोलीस कर्मचारी डिव्हायडरला अडकून रस्त्यावर पडतो. ही संपूर्ण घटना मागील गाडीला लागलेल्या कॅमेरात कैद झाली आहे. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता त्यावर अनेक परस्परविरोधी कमेंट्स येत आहेत. एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं आहे की, ‘आपण रस्त्यावर अशाप्रकारे गाडी चालवणं योग्य नाही. हा प्रकार आपल्यासाठी आणि रस्त्यावर गाडी चालवणाऱ्या अनेकांसाठीही धोकादायक ठरू शकतो’. तर दूसऱ्या यूजरने त्या तरुणीला ‘पापा की परी’ अशी उपमा दिली आहे. तर अनेकजण हा व्हिडीओ आपली महिला सहकारी आणि मैत्रिणींना टॅग करत आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर black_lover_ox नावाच्या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स करण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या :