मंदिर हा लोकांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातच लोकं मंदिर, धर्म, संस्कृती या सगळ्याला घेऊन किती हळवे आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. मग भारता बाहेर काय होत असेल? तिथेही लोकं मंदिर बांधतात. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो प्रत्येकजण आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो. मंदिरं सुद्धा सुंदर असतात. असाच एक दुबईतलं मंदिर व्हायरल होतंय. हे मंदिर आनंद महिंद्रा यांनी शेअर केलंय.
यूएईचे टॉलरन्स मिनिस्टर शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांनी 4 ऑक्टोबर रोजी एका नवीन हिंदू मंदिराचे उद्घाटन केले.
मंदिराचा पाया फेब्रुवारी 2020 मध्ये सुरु झाला होता, म्हणजेच हे मंदिर तयार करण्यासाठी सुमारे 2 वर्षे लागली. आता ते तयार झाल्यावर त्याचे सुंदर फोटोज जगभरात व्हायरल होतायत.
I believe this magnificent Temple was formally inaugurated today. Auspicious timing. Will make sure to visit it on my next trip to Dubai… pic.twitter.com/F5IewLo1ns
— anand mahindra (@anandmahindra) October 5, 2022
या मंदिराचे फोटोज आनंद महिंद्रा यांनी शेअर केले. त्यांनाही ते प्रचंड भावले. सौंदर्य पाहून आनंद महिंद्रांनाही दुबईला जाऊन ते मंदिर पाहण्यासारखं वाटलं.
आनंद महिंद्रा यांनी 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “शुभ काळ. माझ्या पुढच्या दुबई दौऱ्यात मी या मंदिराला नक्की भेट देईन.”
आतापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर आनंद महिंद्रांच्या या ट्वीटला हजारो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाईक आणि शेअर केलं आहे. आनंद महिंद्रा यांच्या कंटेंटच्या निवडीमुळे अनेक जण पुन्हा एकदा चांगलेच प्रभावित झाल्याचे दिसून आले.