पहिली गोष्ट म्हणजे ही बिअर (Beer) तुम्हाला भारतात (India) सहजासहजी सापडणार नाही. ही बातमी वाचूनही तुम्ही जर ही बिअर प्यायची असेल किंवा तसं धाडस करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सिंगापूरचा (Singapore) व्हिसा घ्यावा लागू शकतो. सिंगापूरला जाण्यासाठीही तुम्हाला बराच खर्च करावा लागणार हेही तुम्हाला माहिती आहे. सिंगापूरला जाण्याचा खर्च उचलण्यासाठीही तुम्हाला धैर्याची गरज भासेल. पण केवळ खर्च करण्याचं धाडस पुरेसं नाही, तर ही बिअर पिण्याचं धाडस महत्त्वाचं ठरतं.
जगभरात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागतोय मग त्यात बिअर का मागे पडेल? सिंगापूरमध्ये एक पूर्णपणे नवीन प्रकारचा प्रयोग झालाय. या प्रयोगामुळे बिअर बनवण्याचं तंत्र आणि अनुभव एका वेगळ्याच पातळीवर गेलंय. न्यूब्रू नावाची एक बीअर इथे आहे. चवीला अत्यंत साधारण किंवा इतर बिअर सारखीच लागणारी ही बिअर. पिताना असं काही वाटतच नाही कि काहीतरी वेगळं आहे. त्याची चाचणी इतर कोणत्याही साधारण बिअरसारखीच असते.
पण या बिअर बनवण्याच्या प्रक्रियेत जबरदस्त ट्विस्ट आहे. ही बिअर न्यू वॉटरपासून बनवली जाते. आता आपण विचार करत असाल की हे न्यूवॉटर काय आहे. सिंगापूरच्या सांडपाण्याची व लघवीची स्वच्छता करून हे नवे पाणी तयार केले जाते. संशोधनात माणूस इतका पुढे गेलाय कि बिअर बनवताना माणूस कधी अशी शक्कल लढवेल अशी कल्पना सुद्धा कधी कुणी केली नसेल. तसं पाहता, लघवी आणि गटाराचे पाणी स्वच्छ करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि उच्च गुणवत्तेची काळजी घेतली गेली आहे असं सांगितलं जातं. पण ही बिअर पिण्यासाठी हिंमत हवी ना?
आयएएस दाम्पत्य संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू धुग्गा यांची बदली करण्यात आली आहे. संजीव खिरवार यांना लडाखला, तर रिंकू धुग्गा यांची अरुणाचल प्रदेशला बदली (Transfer) करण्यात आली आहे. दिल्लीच्या त्यागराज स्टेडियम (Thyagraj Stadium) मध्ये फिरणाऱ्या कुत्र्यावरून हे दोन आयएएस अधिकारी वादात आले होते. आता आयएएस जोडप्याला देशाच्या दोन विरुद्ध टोकांवर तैनात केले गेले आहे. अशात सोशल मीडियावर युझर्स आपला कुत्रा आता कुठे जाणार असे प्रश्न विचारत आहेत. #DogWalkingIAS ट्विटरवर ट्रेंड होत आहे, ज्यावर यूजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. बागबान चित्रपटातील गाणी काही युझर्सनी गायली आहेत. – “मैं यहाँ तू वहाँ!” गाण्यासोबत मीम्सही शेअर केले जात आहेत.