आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही! नेहमी सेलेब्रिटींचे फोटो टाकणाऱ्याने हा व्हिडीओ टाकला, व्हायरल!

| Updated on: Jul 08, 2023 | 10:38 AM

आपल्या सगळ्या समस्यांचं समाधान आईकडे असतं. एक महिला संकटकाळी काहीही करू शकते. घर सांभाळू शकते, मुलांना सांभाळू शकते आणि पैसे देखील कमावू शकते. जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात महिला आज काम करतायत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक महिला ई रिक्षा चालवताना दिसतेय.

आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही! नेहमी सेलेब्रिटींचे फोटो टाकणाऱ्याने हा व्हिडीओ टाकला, व्हायरल!
mom viral video
Follow us on

मुंबई: घरात कधीही कोणतीही अडचण आली तरी सगळ्यात आधी उभी राहते ती आपली आई. असं म्हणतात की देव सगळीकडे पोहचू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवलं. खरंय! आपल्या सगळ्या समस्यांचं समाधान आईकडे असतं. एक महिला संकटकाळी काहीही करू शकते. घर सांभाळू शकते, मुलांना सांभाळू शकते आणि पैसे देखील कमावू शकते. जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात महिला आज काम करतायत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक महिला ई रिक्षा चालवताना दिसतेय. आता तुम्ही म्हणाल ई रिक्षा काय, महिला तर विमान चालवतात. पण नाही हा व्हिडीओ जरा खासच आहे.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ कुठला आहे आणि ही महिला कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. या व्हिडीओमध्ये एक महिला ई-रिक्षा चालवतेय. पण व्हिडीओ नीट पाहिला तर समजतं की या महिलेच्या मांडीवर एक मूल आहे. लहान मूल. ती आपल्या बाळाला घेऊन ई रिक्षा चालवते आहे. हा व्हिडीओ बघून माणूस भावुक होतो. कष्ट करताना ही माता आपल्या लहान मुलाचं देखील संगोपन करतेय. नेहमी सेलेब्रिटीचे व्हिडीओ टाकणाऱ्या, फोटो टाकणाऱ्या ‘viralbhayani’ ने इन्स्टाग्रामवर या मातेचा व्हिडीओ पोस्ट केलाय ज्याला त्याने “इस वीडियो को कैप्शन की आवश्यकता नहीं है, मां.” असं कॅप्शन दिलंय.

इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओमुळे सोशल मीडिया युजर्स भावूक झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्यात. प्रियांका नावाच्या एका युजरने आई-वडिलांबद्दल लिहिलं, ‘आई-वडिलांइतके आपल्यावर जगात कोणीही प्रेम करत नाही. देव सर्वत्र पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली. आई लव यू माँ.”