Amarnath Yatra On Bike: विषयच ना! सांगली ते अमरनाथ मोटारसायकलवर, 74 वर्षाच्या तरूणाच्या उत्साहाला सलाम!

| Updated on: Jul 11, 2022 | 3:34 PM

श्रद्धेला आणि उत्साहाला वय लागत नाही हे चौहान यांना बघून कळतं. माणूस नुसता थोडासा रोजच्या किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालवायला लागला की रडतो पण जे.के चौहान यांना बघून नेमकं या व्यक्तीच्या उत्साहाचं रहस्य काय असा प्रश्न पडतो.

Amarnath Yatra On Bike: विषयच ना! सांगली ते अमरनाथ मोटारसायकलवर, 74 वर्षाच्या तरूणाच्या उत्साहाला सलाम!
J K Chauhan Sangli to Amarnath
Image Credit source: Social Media
Follow us on

जम्मू: भगवान शंकरावर (Bhagwan Shankar) असणाऱ्या अढळ श्रद्धेपोटी महाराष्ट्रातील सांगलीतील जे. के. चौहान हे वयाच्या 74व्या वर्षी अमरनाथ (Amarnath Yatra) यात्रेला निघाले आणि त्यांचे व्हिडीओज जाम व्हायरल झाले. सांगलीचे जे. के. चौहान मोटारसायकलवरून यात्रेला जात आहेत असे व्हिडीओज व्हायरल (Viral Videos) होतायत. श्रद्धेला आणि उत्साहाला वय लागत नाही हे चौहान यांना बघून कळतं. माणूस नुसता थोडासा रोजच्या किलोमीटरपेक्षा जास्त गाडी चालवायला लागला की रडतो पण जे.के चौहान यांना बघून नेमकं या व्यक्तीच्या उत्साहाचं रहस्य काय असा प्रश्न पडतो. बरं म्हणजे श्रद्धा एका बाजूला आणि त्या श्रद्धेपोटी इतक्या लांब मोटारसायकल चालवत जाणं एका बाजूला…पण हे बाबा वाढीव आहेत! कलाम आहेत, यांच्या उत्साहाला सलाम!

चौहान रात्रीचा वेळ मंदिरांमध्येच घालवतात

पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर अण्णा हजारे टोपी, पांढरी शुभ्र पँट परिधान केलेले चौहान मोटारसायकलवरून सांगलीहून जम्मूला निघतात, आपली दुचाकी चालवताना 10 हजार 700 रुपयांचे पेट्रोल वापरल्याचा दावा त्यांनी केलाय. इतकंच काय तर ते दररोज 500 किमी अंतर पार मोटारसायकलने पार करतात असंही सांगतात. या प्रवासात चौहान रात्रीचा वेळ मंदिरांमध्येच घालवतात. जिथे कुठे वाटेत मंदिर दिसेल तिथे ते मुक्कामी थांबत. जेवायची व्यवस्था त्यांची लंगरमुळेच होत असे. वाटेत लंगर दिसलं की ते थांबून जेवत.

हे सुद्धा वाचा

लंगर सापडत नाही, तिथे ते हॉटेलमध्ये जेवण करतात

महाराष्ट्राच्या सांगलीतला हा शेतकरी याआधी 12 वर्षे सायकलवरून, सहा वर्षे पायी अमरनाथला चालत गेलाय. 2014 पासून ते दुचाकीवरून यात्रेसाठी जात आहेत. चौहान म्हणतात, कोविड महामारीच्या मागील दोन वर्षांच्या काळात तीर्थयात्राही केली. चौहान म्हणाले की, त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत आणि जिथे त्यांना लंगर सापडत नाही, तिथे ते हॉटेलमध्ये जेवण करतात. “पवित्र गुहेला भेट देण्यात मला खूप आनंद मिळतो आणि मला कशाचीही भीती वाटत नाही किंवा मला कधीही धोका वाटला नाही,” असा दावा करून ते पुढे म्हणाले: “जेव्हा भगवान शिव माझी काळजी घेण्यासाठी तेथे असतात, तेव्हा मला कशाचीही भीती का वाटली पाहिजे.”