ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. आपल्या मनाची परीक्षा घेण्याचा हा एक मजेदार मार्ग आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक रंजक ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट घेऊन आलो आहोत, जी तुम्हालाही नक्कीच चक्रावून टाकेल. या ऑप्टिकल भ्रमात, आपल्याला बरेच पक्षी एकसारखे दिसणार आहेत. पण या पक्ष्यांमध्ये एक पांडाही कुठेतरी लपला आहे. त्याला शोधण्यासाठी भल्याभल्यांना घाम फुटतो आहे. आव्हान हे आहे की, जर तुम्हाला 15 सेकंदात पांडा सापडला तर तुम्हाला प्रतिभावान म्हटले जाईल. मग सुरुवात करा आणि त्या पांडाला शोधा.
हंगेरियन कलाकार गर्जली दुडास यांनी हे चित्र तयार तयार केलंय. त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की, गोंधळात टाकणारी चित्रं बनवण्यात तो खूप निपुण आहे.
त्यांनी बनवलेली चित्रं पाहून लोकांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्याने चित्रात एकसारखे दिसणाऱ्या पक्ष्यांचा ढीग काढलाय.
काही सनग्लासेस आणि बेसबॉल कॅप्स घालून आले आहेत. याशिवाय कॉलर टी-शर्टमध्येही काही पक्षी दिसतात. पण या पक्ष्यांमध्ये त्यांच्यासारखा दिसणारा पांढरा पांडाही लपून बसलेला आहे. परंतु अट अशी आहे की आपल्याला ते 15 सेकंदाच्या आत शोधावे लागेल.
आम्हाला खात्री आहे की आपण या चित्रात वाईट प्रकारे अडकले असाल. कारण तो बनवणाऱ्या कलाकाराने पांडाला अशा प्रकारे लपवून ठेवलं आहे की, ते सहजासहजी लोकांना दिसत नाही.
खरं तर पक्षी आणि पांडा यात फारसा फरक नाही. त्याचबरोबर रंग-रूप जवळपास सारखेच असते. यामुळे लोकांना पांडा दिसत नाहीये.