बिझनेस टायकून आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांची विनोदबुद्धी खरोखरच आश्चर्यकारक आहे. ट्विटरवर (Twitter) त्याच्या मजेशीर उत्तराबद्दलही तुम्ही ऐकलं असेल. कधी ते भारतातील जुगाडू लोकांचे व्हिडिओ (Video) सामायिक करतात तर कधी ते प्रेरणादायक कथांबद्दल सांगतात. आनंद महिंद्रा यांना अनेकजण आपला आदर्श मानतात. पुन्हा एकदा महिंद्राचं हे ट्वीट खूप चर्चेत येत आहे. लहानपणी कधी ना कधी झिरो क्रॉस असलेला खेळ प्रत्येकाने खेळला असेल. आनंद महिंद्रा यांना कॉफी मग आवडलाय आहे ज्यावर हा गेम बनवला गेलाय. पण तो खेळण्याचा मार्ग थोडा वेगळा आहे. सर्वात आधी तुम्ही हे ट्विट सोशल मीडियावर जे व्हायरल होतंय ते बघा…
I’m going to get this mug. Clever. The solution to a problem often lies by joining the dots with something OUTSIDE your own ecosystem… pic.twitter.com/SedGrDN8B9
— anand mahindra (@anandmahindra) August 10, 2022
खरं तर या मगवर असं लिहिलं आहे की, वेगळा विचार करा आणि त्याखाली शून्य असतात आणि एका खोक्याच्या आत क्रॉस असतात. हा फोटो शेअर करत महिंद्राने लिहिले की, मी हा मग घेणार आहे. हुशार! एखाद्या समस्येचे निराकरण बऱ्याचदा आपल्या स्वत:च्या इकोसिस्टमच्या बाहेरील एखाद्या गोष्टीशी बिंदू जोडून शोधले जाते. काही लोकांनी त्यावर अनेक वेगवेगळे रिप्लाय सुद्धा दिलेत.
आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट हजारो लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) लाईक आणि शेअर केले आहे. आनंद महिंद्रा यांच्या कंटेंटच्या निवडीमुळे अनेक जण पुन्हा एकदा चांगलेच प्रभावित झाल्याचे दिसून आले. महिंद्रा अनेकदा ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी बोलताना दिसतात.