कधी पाहिलीये का प्राण्यांमधली माणुसकी? इथे माणूस माणसाला मदत करत नाही प्राणी तर लांबच राहिला. पण प्राण्यांमध्ये जास्त प्रामाणिकपणा आणि आपुलकी असते हे सत्य तसं कुणी बदलू शकत नाही. म्हणूनच की काय आता हळू हळू माणसाची जागा प्राणी घ्यायला लागलाय. मित्रापेक्षा लोकं कुत्रं ठेवतील पण प्राण्यावर (Animals) जास्त विश्वास ठेवतील. एक फोटो प्रचंड प्रमाणात वायरल होतोय. वादळ येतं आणि मांजराची इवलुशी पिल्लं (Kittens) गांगरून जातात, घाबरतात. अशावेळेला एक कोंबडी त्यांना मदत करते. या फोटोवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. लोकांना हा फोटो प्रचंड आवडलाय. अर्थात फोटो पण तितका सुंदर आणि माणुसकीचं (Humanity) दर्शन घडवणारा आहे.
सोशल मीडियावर अनेक फोटो वायरल होतात. काही अक्षरशः भावुक करणारे असतात. आता तसा कोंबडी आणि मांजरीचा काय संबंध? एखाद्या प्राण्यांनं आपल्याच पिल्लाला संरक्षण देणं ही खूपच समजून घेता येण्यासारखी गोष्ट आहे. असं माणूससुद्धा करतो. पण एका प्राण्याने दुसऱ्या प्राण्याला संरक्षण देणं हा कुठला चमत्कार म्हणायचा? मांजरीची पिल्लं वादळाला घाबरली म्हणून कोंबडी संरक्षण देते. फोटोमध्ये दोन छोटीशी मांजरीची पिल्लं आहेत आणि त्या दोन पिलांना त्या कोंबडीनं आपल्या पंखाखाली आसरा दिलाय. किती कमाल आहे. फोटोमध्ये गांगरून गेलेली मांजरीची पिल्लं स्पष्ट दिसून येतात. फोटो बघताच क्षणी प्रेमात पडायला होतं.
A hen taking care of frightened kittens during a storm.. ? pic.twitter.com/f6osykKBnk
— Buitengebieden (@buitengebieden) June 1, 2022
एका पालकाने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी चक्क एका आयएएस अधिकाऱ्याला पत्र लिहिलंय. आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी पालक नेहमीच प्रयत्न करत असतात. पण कधी कुठल्या पालकाने मुलगा/ मुलगी आयएएस व्हावा यासाठी कुठल्या अधिकाऱ्याला पत्रं लिहिल्याचं ऐकलंय का? आयएएस अविनीश शरण या अधिकाऱ्याला एक पत्रं आलंय आणि हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड वायरल झालंय. ही बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.