Viral: दोन दिवसाच्या छोट्याशा बाळाचं पिअर्सिंग बघून नेटकरी भडकले! आईवर टीकेची झोड, डॉक्टरांनी केलं समर्थन

| Updated on: Jun 10, 2022 | 5:58 PM

महिलेने आपल्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तिने आपल्या दोन दिवसांच्या नवजात बाळाचे कान टोचून तिच्या कानात कानातले घातले होते, त्यानंतर इंटरनेटवरील लोकांनी त्या महिलेला बरंच सुनावलं.

Viral: दोन दिवसाच्या छोट्याशा बाळाचं पिअर्सिंग बघून नेटकरी भडकले! आईवर टीकेची झोड, डॉक्टरांनी केलं समर्थन
दोन दिवसाच्या छोट्याशा बाळाचं पिअर्सिंग
Image Credit source: Facebook
Follow us on

भारतात मुलाचे नाक आणि कान टोचण्याची (Piercing) परंपरा आहे, पण मूल 4-5 वर्षे वय ओलांडल्यानंतरच असे घडते. अनेक वेळा मुली मोठ्या झाल्यानंतर हे केलं जातं. पण एका आईने आपल्या दोन दिवसांच्या चिमुकलीचे कान टोचले, त्यानंतर तिला प्रचंड टीकेला सामोरं जावं लागलं. मात्र, डॉक्टरांनी त्यामागचे कारण सांगून लोकांना गप्प केले. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटनमध्ये (Britan) राहणाऱ्या लारा नावाच्या महिलेने आपल्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे. तिने आपल्या दोन दिवसांच्या नवजात बाळाचे कान टोचून तिच्या कानात कानातले घातले होते, त्यानंतर इंटरनेटवरील (Internet) लोकांनी त्या महिलेला बरंच सुनावलं, एकतर ब्रिटनमध्ये कान टोचण्याची प्रथा नाही आणि त्यात दोन दिवसांच्या मुलीचे कान टोचले म्हणून लोकं अजून भडकले आणि त्यांनी कमेंट्स करायला सुरूवात केली.

दोन दिवसांच्या बाळाची कान टोचणी

खरं तर या महिलेनं @Laraticaofficial नावाच्या टिकटॉक अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती सांगते की, चार महिन्यांत आपलं बाळ किती बदललं आहे. या व्हिडीओमध्ये लहान मुलीचे कान टोचले असून त्यामध्ये तिने कानातले घातलेले आहेत, असं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ पोस्ट होताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि युझर्सनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली.

डॉक्टरांकडून या निर्णयाचं समर्थन

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हे ब्लँकेट गुंडाळलेले नवजात शिशू आणि कानातले घालून रुग्णालयात पडले आहे. मुलीच्या आईच्या निर्णयावर हॉस्पिटलचे निओनॅटॉलॉजिस्ट म्हणतात, “लाराने बाळाचे कान टोचले.” ते पुढे म्हणाले, “मुलं दोन-तीन दिवसांची झाल्यावर त्यांना एक-दोन वर्षांप्रमाणे वेदना जाणवत नाहीत.” या महिलेचा असा दावा आहे की, लाराने मुलाच्या कान टोचण्यावर आक्षेप घेतला नाही कारण मुलं लहान असताना मुलांची त्वचा बरीच मऊ असते.

हे सुद्धा वाचा

एक वादग्रस्त विषय

यूकेमध्ये लहान मुलांचे कान टोचणे हा एक वादग्रस्त विषय आहे जो जगात सामान्यत: चर्चिला जातो. “रोमानियामध्ये रुग्णालयातच मुलांचे कान टोचले जातात,ही एक परंपरा आहे” अशी प्रतिक्रिया एका टिकटॉक युझरने दिली आहे. काही युझर्सनी आईच्या या निर्णयावर टीका केली आणि हे मुलाच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचंही म्हटलं आहे.

मुलाला टिटॅनसचा धोका असतो

जोपर्यंत आपल्या मुलास कान टोचण्यापूर्वी टिटॅनसची लस दिली जात नाही तोपर्यंत आपण हे करू नये. खरं तर, यामागील तर्क असा आहे की, लहान मुलांची लस कान टोचण्यामुळे होणारा संसर्ग रोखण्यास असमर्थ आहे. अशावेळी कान टोचून मुलाला टिटॅनस होण्याचा धोका असतो.