Viral Video: बैलाचा रेल्वेने प्रवास, प्रवासी बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल झाला!

| Updated on: Aug 06, 2022 | 10:27 AM

कन्फर्म तिकीट (Confirm Ticket) असूनही लोकांना सीट मिळत नाही यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता की आपल्याकडे रेल्वेत किती गर्दी असते पण या ट्रेनमध्ये एखादा बैल 'स्वार' होताना दिसला तर?

Viral Video: बैलाचा रेल्वेने प्रवास, प्रवासी बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल झाला!
viral video
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतात प्रवाशांना रेल्वेतून (Indian Railway) प्रवास करण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागतो. कन्फर्म तिकीट (Confirm Ticket) असूनही लोकांना सीट मिळत नाही यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता की आपल्याकडे रेल्वेत किती गर्दी असते पण या ट्रेनमध्ये एखादा बैल ‘स्वार’ होताना दिसला तर? होय, तुम्ही ते बरोबर वाचले, हे प्रकरण बिहारमधून समोर आले आहे. जे पाहिल्यानंतर लोक खूप आश्चर्यचकित होतात. बिहारमधील (Bihar) भागलपूरमधील पीरपंथी येथे हा प्रकार समोर आला आहे. जिथे लोकल ट्रेनमध्ये बैल सामान्य प्रवाशांप्रमाणे प्रवास करताना दिसतो. आश्चर्य म्हणजे हा बैल आपल्या घराभोवतीच्या तबेल्यात जसा बांधला जातो तसाच ट्रेनमध्ये बांधला गेलाय. हे दृश्य तिथे उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि सोशल मीडियावर शेअर केलं, जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अनेकदा लोक कुत्रा मांजरांसोबत प्रवास करताना दिसतात

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ईएमयू पॅसेंजर ट्रेनमध्ये एक बैल प्रवाशांसोबत प्रवास करताना दिसत आहे, जे पाहून अनेक प्रवासी वैतागले आहेत, तर अनेकजण ती बोगी सोडून दुसऱ्या बोगीकडे धावत आहेत. ट्रेनमध्ये लहान प्राण्यांसह प्रवास करणे सामान्य आहे. अनेकदा लोक कुत्रा मांजरांसोबत किंवा इतर लहान प्राण्यांसोबत प्रवास करताना दिसतात. परंतु मोठ्या बैलासह ट्रेनमध्ये प्रवास करणे लोकांना यापूर्वी क्वचितच दिसले असेल.

सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 62 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले असून कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून लोक प्रश्न विचारत आहेत की, बैलाला ट्रेनमध्ये घेऊन जाण्याची परवानगी तुम्हाला कशी मिळाली? त्याचबरोबर या बैलानेही प्रवासाचे तिकीट काढले का, अशी मजेशीर विचारणा करणारे काही युझर्स आहेत.”