कॉलेज शिक्षणाचे केंद्र आहे. कॉलेजमध्ये शिक्षणाबरोबर विविध कलागुणांना वाव देण्याचे उपक्रम सुरु असतात. त्यात कॉलेज फेस्टचा उपक्रम म्हणजे तरुणाईसाठी जल्लोषच असतो. त्यात गाणे, नृत्य, एकांकीका, मिमिक्री, कविता असे अनेक प्रकार होत असतात. सध्या एका महाविद्यालयातील कॉलेज फेस्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओत चक्क एक युवती ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर परफॉर्मेंस करताना दिसत आहे. त्यानंतर हजारो युजर्स भडकले आहेत. सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. या प्रकारचे नृत्य महाविद्यालयात होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
महाविद्यालयात ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर अश्लिल नृत्य युवती करत आहे. गाण्याच्या बोलाप्रमाणे तिचे हावभाव दिसून येत आहे. यामुळे इंटरनेटर युजर्स भडकले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये असा प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अनेकांनी व्हिडिओच्या नैतिकतेवर चिंता व्यक्त केली आहे.
कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करणाऱ्या युवतीचा व्हिडिओ एक्सवर @divya_gandotra नावाच्या युजरने शेअर केला आहे. त्यात ती युवती पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान करुन डान्स करत आहे. ‘चोली के पीछे क्या है’ नुकतीच रिलिज झालेल्या क्रू चित्रपटातील आहे. दिलजीत दोसांझ, अलका याग्निक आणि इला अरुण द्वारा त्याला गायले गेले आहे.
Is all of this happening inside an educational institution? pic.twitter.com/dg1WGSNi7L
— Divya Gandotra Tandon (@divya_gandotra) May 1, 2024
सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स संतापले आहेत. शैक्षणिक संस्थानमध्ये अशा गाण्यास परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. काही जणांनी त्या युवतीच्या डान्सवर प्रश्न उपस्थित केले आहे. एका युजर्सने म्हटले आहे की, कॉलेज फेस्टच्या नावावर नैतिकता नवीन नीच्चांकावर आली आहे. दुसरा युजर्स म्हणतो, कॉलेजमध्ये बॅली डान्स म्हणजे खूप पुढे जाणे वाटत असले. परंतु अश्लिलतावर प्रहार करणे गरजेचे आहे. काही जणांनी त्या युवतीचे समर्थन केले आहे. आपल्याकडे तालिबानी राजवट नाही. ही एक चांगली कला आहे. काहींना महिलांचे सक्षमीकरण, असे म्हटले आहे.