मुंबई : तरुणांमध्ये स्टंटचा क्रेज वाढत चाललाय. सोशल मीडियावर (social media) आपन अनेक स्टंटचे (stunt) व्हिडीओ पाहत असतो. अनेक व्हिडीओ व्हायरलही (Viral Video) होतात. अनेकदा स्टंट करताना दुखापत झाल्याचंही समोर आलंय. मात्र, तरुण मंडळी स्टंट करणं काही सोडत नाही. स्टंट फक्त तरुण करतात असंही नाही. लहान मुलांपासून तरुणांपर्यत स्टंट करणारे दिसून येतात. ट्विटरवर अशा प्रकारे अनेक व्हिडीओ रोज दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. तुम्ही म्हणाल आता कोणता नवीन स्टंट. तर मग ऐका, सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स देखील आश्चर्यचकिती झाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून ट्विटर, इन्स्टाग्रामवर तो व्हायरल होतोय. या व्हिडीवर नेटिझन्सनं वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
सोशल मीडियावर व्हायर झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाल टी शर्ट घातलेला एक तरुण इमारतीच्या छतावर धावत येतो. त्यानंतर तो उंच उडू मारून दुसऱ्या इमारतीवर पोहचतो. या उंच उडीदरम्यानचं दृष्य अंगावर काटा आणतं. कारण, यादरम्यान, हा तरुण खाली पडण्याची सर्वाधिक शक्यता असते. तर दोन इमारतीमधील अंतर अधिक असल्यानं कुणालाही हा प्रकार धोकादायक वाटू शकतो. कारण, खाली पडल्यास किंवा तोल गेल्यास मृत्यू ओढवण्याची शकता असते. पण, व्हिडीओवरुन असा अंदाज लावल्या जातोय की या स्टंटसाठी या तरुणानं खूप सराव केला असावा.
अशा प्रकारचे कोणतेही जीवघेणे स्टंट करु नये. अशा स्टंटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तरुणानं सराव केला आहे. त्यामुळे तो योग्यरित्या एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर पोहचू शकला. मात्र, अशा प्रकारचे स्टंट करणे पूर्णपणे चुकीचंच आहे. या व्हिडीओला 6 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय. तर 44 हजार पेक्षा अधिक लोकांना या व्हिडीओला लाईक केलंय.
इतर बातम्या