ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यानुसार अनेक जण आपले कामे करत असतात. ज्योतिषीच्या सल्ल्याने नवीन उद्योग, व्यवसाय सुरु करणारे अनेक जण आहेत. अनेक जण विशिष्ट अंक शुभ मानून काम करतात. मग त्या अंक असणाऱ्या तारखेला नवीन काम सुरु करतात. आपल्या वाहनाचे क्रमांक विशिष्ट अंक ठेवता. सोशल मीडियावर अंकशास्त्रचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये मोबाईलचा क्रमांक आणि तुमचा स्वभाव दिला आहे. अनेकांनी या व्हिडिओला लाईक करत शेअर केले आहे. अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणीने कागदाचा छोटा तुकडा हातात धरला आहे. त्यामध्ये मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक आणि तुमचा स्वभाव याची जोड दिली आहे. kiran_handwriting या इंस्टग्राम अंकाऊटवरुन ही पोस्ट केली गेली आहे. या युजरचे फॉलोअर्स हजारोच्या घरात आहे.
Kiran_handwriting याने ही पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, सांगा मग तुम्ही कसे आहात? मग त्यांच्या या प्रश्नावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेक युजर आपल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे अक्षर सांगत आपला स्वभाव कसा आहे, ते सांगत आहे. एका युजर्सने म्हटले मी मनमिळावू आहे. दुसऱ्या युजर्सने आपण कष्टाळू आहोत. आता पुढे काय करावे, असे विचारले आहे. आणखी एका युजरने गंमतच केली आहे. त्याने आपण सरळ झोपाळू असल्याचे मान्य केले आहे. म्हणजे त्याच्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे अक्षर शून्य आहे. काही युजरने तुमचा अंदाज योग्य असल्याचे म्हटले आहे.