भारतात लोकांकडे व्यवसायासाठी अजब गजब टॅलेंट (Indian Talent) आहे. लोकं काय शक्कल लावतील, कसा त्यांचा व्यवसाय चालवतील ह्याचा काहीच नेम नसतो. मध्ये कच्चा बादामचं एक गाणं आलं होतं. त्या गाण्यात बदामाचं वर्णन होतं. बरेचदा बाजारातील व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात ज्यात लोकं एकमेकांशी स्पर्धा करत असतात. खरं तर भारतातील लोकंच जर हटके (Unique Style) असतील तर एखादी गोष्ट विकण्यासाठी सुद्धा तितक्याच ताकदीची आयडिया लागते. आता हा व्हिडीओच बघा. या व्हिडीओत हे आजोबा नमकीन विकतायत. मग ते छान पद्धतीने चाल लाऊन ते नमकीन (Viral Video Bhopal) विकताना दिसून येतायत. हे ऐकायला सुद्धा इतकं सुंदर आहे की कुणी गरज म्हणून नाही पण ते विकण्याची पद्धत छान आहे म्हणून प्रभावित होऊन विकत घेऊ शकतं. हा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच हवा…
45 सेकंदांचा हा व्हिडीओ. काहीच वेळात तुमच्या मनावर राज्य करू शकतो. बजाजच्या ‘क्लासिक’ स्कूटरवर बॅग घेऊन बसलेला एक वयस्कर चाचा आपल्याला दिसतो.
वय आणि स्वॅग याचा परस्परांशी काहीच संबंध नसतो हे दाखवणारा हा व्हिडीओ आहे. त्याच्याकडे या वयातसुद्धा एक वेगळाच स्वॅग आहे.
त्याने एक टोपी घातली आहे, ज्यावर बॉय लिहिले आहे. एवढेच नव्हे तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्या पद्धतीने आवाज काढतो ते ऐकून संपूर्ण इंटरनेटच त्याचे फॅन झाले आहे!
हा व्हिडिओ २ सप्टेंबर रोजी @manishbpl1 ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलाय. कॅप्शनमध्ये लिहिलंय – भोपाली नमकीन वाला. भोपाळमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. पहा की जनाब किती आश्चर्यकारकपणे नमकीन विकत आहे!
#भोपाली नमकीन वाला… #भोपाल में टैलेंट की कमी नहीं… आप ही देखिये किस गज़ब अंदाज से जनाब नमकीन बेच रहें हैं..?#Bhopal pic.twitter.com/ONEiMgko60
— manishbpl (@manishbpl1) September 2, 2022
भोपाळचा हा व्हिडीओ “कच्चा बदाम” सारखाच फेमस झालाय. यात हे आजोबा नमकीनची किंमत सांगताना,”ती…ती…ती…तीस रुपये के नमकीन” असं एकदम गाडीचा हॉर्न वाजविल्यासारखं म्हणतायत. त्यांच्याकडे नमकीन मध्ये कोणते वेगवेगळे प्रकार आहेत हेही ते एकदम अनोख्या पद्धतीनं सांगतायत.
या व्हिडीओला एक हजाराहून अधिक लाईक्स आणि सुमारे दोनशे रिट्विट मिळाले आहेत. तर चाचांची क्लिप तीस हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे.