VIDEO | ट्विटरवर का ट्रेंड होतोय #Dosa? व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की पाहा

| Updated on: Sep 07, 2021 | 9:02 AM

खाण्यापिण्याची खरी मजा फक्त स्ट्रीट फूडमध्येच येते. येथे दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात. काही जण सेवा देण्याची नवीन पद्धत घेऊन येतात, तर काही नवीन प्रयोग करुन पदार्थाला नवीन चव देतात. दक्षिण भारतीय डिश डोसा या रेसिपीवर बरेच प्रयोग केले जात आहेत. तुम्हीही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील. सध्या #Dosa ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

VIDEO | ट्विटरवर का ट्रेंड होतोय #Dosa? व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की पाहा
Dosa Viral Video
Follow us on

मुंबई : खाण्यापिण्याची खरी मजा फक्त स्ट्रीट फूडमध्येच येते. येथे दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात. काही जण सेवा देण्याची नवीन पद्धत घेऊन येतात, तर काही नवीन प्रयोग करुन पदार्थाला नवीन चव देतात. दक्षिण भारतीय डिश डोसा या रेसिपीवर बरेच प्रयोग केले जात आहेत. तुम्हीही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील. सध्या #Dosa ट्विटरवर ट्रेंड करत आहे. याचे कारण देखील एक नवीन रेसिपी आहे. पण, लोकांना ते आवडलेले नाही. बहुतेक ट्विटर वापरकर्ते रेसिपीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या दुकानदाराला वाईटसाईट बोलत आहेत. तर, काही असे म्हणतात की डोसा सोडून द्यावा लागेल असे वाटत आहे.

डोसा बनवणाऱ्या एका दुकानदाराचा व्हिडिओ ट्विटरवर @ragiing_bull नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. हे आतापर्यंत सव्वा दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक दुकानदारावर अक्षरश: चिडले आहेत. खरं तर बरेच वापरकर्ते डोसाच्या रेसिपीवर समाधानी नाहीत. कोणी म्हणत आहे की चांगला डोसा उध्वस्त झाला आहे. तर कोणी म्हणत आहे की हा डोसा बनवत आहे की पिझ्झा बनवत आहे. एका वापरकर्त्याने विनोदाने दुकानदाराच्या अटकेची मागणी केली आहे. तर, दुसऱ्या वापरकर्त्यानेही मजेशीर टिप्पणी केली आणि त्याने लिहिले की निर्दोष डोसाच्या हत्येची सीबीआय चौकशी व्हायला हवी.

डोसा बनवणाऱ्या एका दुकानदाराच्या या व्हायरल व्हिडीओनंतर डोसा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करायला लागला आहे. लोक हॅशटॅग लावून डोसाचे फोटो शेअर करत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की पहिले #dosa होता, मग हलवा आणि नंतर तो पान बनला.

संबंधित बातम्या :

VIDEO : ‘जेसीबी की खुदाई’नंतर जेसीबीचा नवा व्हिडीओ, थेट बीचवर तरुणाला डिवचणारा जेसीबी, भन्नाट व्हिडीओ

खतरनाक! मुलीचा अफलातून स्टंट, नेटीझन्स विचारतायत अंगात हाडं आहेत की नाही?