मुंबई : कुणाचीही मदत करणं, कुणाला अडचणीतून बाहेर काढणं किंवा अडलेल्या-नडलेल्यांना मदतीचा हात पुढे करणं, याला आपल्याकडे चांगला गुण असल्याचं मानलं जातं. अशा मदत करणाऱ्यांना आपण मदतगारही म्हणतो. कुणालाही मदत करणं, मदतीसाठी धावून येणं, हा मानवी स्वभावाचा चांगला गुण झाला. आई-वडील लहानपणी अनेक गोष्टी शिकवतात. त्यामध्ये मदत करणं, मदतीचा हात (helping hand) पुढे करणं, हे देखील सांगितलं जातं. मात्र, सोशल मीडियावर (Social media) याच मदतीच्या हातावरुन चर्चा रंगली आहे. ती चर्चा आहे एका जेसीबीच्या व्हिडीओविषयी. तुम्ही म्हणाल मदत आणि जेसीबीचा व्हिडीओ, याचा काय संबंध आहे. तर अलीकडेच सोशल मीडियावर जेसीबीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये मदत करणारा माणूस नसून जेसीबी आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? पण सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) झालेल्या या व्हिडीओत एक जेसीबी (JCB)दुसऱ्या जेसीबीला मदत करताना दिसतोय.
जेसीबीच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक जेसीबी दुसऱ्या जेसीबीची मदत करताना दिसून येतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक जेसीबी पाणी आणि चिखलात फसला आहे. जेसीबीचा चालक जेसीबी काढण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्याला त्यामध्ये अपयश येत असल्याचं दिसून येतंय. त्याच्याकडून तो जेसीबी पूर्णपणे फसला आहे. आता याचवेळी एक दुसरा जेसीबी चिखलात फसलेल्या जेसीबीची मदत करताना दिसून येतोय. चिखलात फसलेल्या जेसीबीला दुसरा जेसीबी अखेर वर काढतो. या व्हिडीलोला अनेक नेटकऱ्यांनी मदतीचे हात, असं म्हटलंय. तर अनेकांनी मदतीचं हे उत्तर उदाहण असल्याचं म्हटलंय.
Raising a #HelpingHand…#HelpChain.#Humanity #KindnessMatters pic.twitter.com/WeSBq5pd4a
— Dipanshu Kabra (@ipskabra) March 10, 2022
जेसीबीच्या व्हायरल झालेल्या या व्हिडोओला आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओसोबत मदतीचे हात, असा उल्लेख केला आहे. या 28 सेकंदाच्या व्हिडीओला आतापर्यंत 2 हजार 500 लोकांनी बघितलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओला लाईकही केलंय. मदतीचे हात कसे असून शकतात, याचं उत्तम उदाहरण हा जेसीबीचा व्हयरल व्हिडीओ आहे.
इतर बातम्या