परीक्षेच्या वेळी (During Exams) 90 टक्के विद्यार्थ्यांची अवस्था चांगलीच टाईट होते. कधीही विचारा कुणालाही विचारा, अभ्यास हा कधीच कुणाचा झालेला नसतो. विद्यार्थ्यांना ऑप्शन बेस्ड परीक्षा (Option Based Exam) फार आवडतात. का सांगा बरं? ऑप्शन बेस्ड परीक्षांमध्ये देवाचं नाव घेऊन तुक्का मारता येतो अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर देवाचं नाव घेऊन, डोळे झाकून वाटेल तो ऑप्शन निवडता येतो आणि मग पुढे काय…पुढे सगळं “राम भरोसे!” असे नशिबावर ऑप्शन बेस्ड पेपर सोडवणारे नग खूप आहेत. बरेचदा अशा पोरांना चुकून चांगले गुण सुद्धा मिळून जातात. एकदम कमी मार्क्स मिळणारे सुद्धा खूप आहेत याच “राम भरोसे” निंजा टेकनिक मुळे! वायरल व्हिडीओ (Viral Video) मधला हा मुलगा पेपर सोडवतोय. त्याच्या उत्तरं देण्याचा टेकनिक वरून तरी तो नक्कीच ऑप्शन बेस्ड प्रश्न सोडवतोय हे कळून येतंय.
40 सेकंदाची ही क्लिप एखाद्या क्लासरूममधली आहे. हा विद्यार्थी वर्गात सगळ्यात शेवटी बसलेला आहे. व्हिडीओ नीट बघितला की कळून येतं हा मुलगा प्रश्नपत्रिकेकडे बघून हात जोडतोय. मग पेन्सिल उत्तरांवरून गोल गोल फिरवतोय आणि मग जे उत्तर अक्कड बक्कड बंबे बो करून आवडेल त्या उत्तरावर तो ती पेन्सिल ठेवतोय आणि उत्तर मार्क करतोय. हा मजेशीर व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर व्हायरल केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले- ‘तुक्का’ लावून प्रश्न सोडवण्याची योग्य ‘पद्धत’. या पोस्टला कित्येक हजारांहून अधिक व्ह्यूज आणि शेकडो रिट्विट मिळाले आहेत. हा व्हिडिओ 91 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. युझर्स मजेशीर कमेंट्सही करत आहेत.
‘तुक्का’ लगाकर प्रश्न हल करने की सही ‘विधि.’ pic.twitter.com/Ir8t3DVzWZ
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 2, 2022
‘अक्कड़ बक्कड़ बंबे बोल, अस्सी नब्बे पूरे सौ। सौ से हटा ताला, चोर निकलकर भागा।’ उक्त निंजा टेक्निक का मंत्र यही है।
— Shivam Bajpai (@JBreakingBajpai) June 2, 2022
हा व्हिडीओ खूप लोकांच्या पसंतीस उतरलाय. अनेक लोकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. कुणी लिहिलंय,”अप्रतिम निन्जा टेक्निक!” काही म्हणतात, “अशा पद्धतींचा लहानपणी फार उपयोग केलाय. काहीही असो पण जेव्हा अशा पद्धतीचा वापर करून उत्तरं बरोबर यायची तेव्हा मनाला एक वेगळंच समाधान मिळायचं.” काही लोकांना तर अक्कड़ बक्कड़ बंबे बोल,अस्सी नब्बे पूरे सौ, सौ से हटा ताला, चोर निकलकर भागा हेच आठवतंय व्हिडीओ बघून.