ट्रेनपेक्षा वेगाने धावणारा माणूस! विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा

| Updated on: Jan 03, 2023 | 10:40 AM

एक माणूस मेट्रोसोबत रेस करत आहे. 1 मिनिट 37 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत.

ट्रेनपेक्षा वेगाने धावणारा माणूस! विश्वास बसत नसेल तर तुम्हीच पाहा
running faster than train
Image Credit source: Social Media
Follow us on

तुम्ही कधी रेल्वेपेक्षा फास्ट पळणारा माणूस पाहिलाय का? होय. एक माणूस खरोखरच इतक्या जोरात पळाला आहे की व्हिडीओ बघून तुम्हीच आश्चर्यचकित व्हाल. काही वेळा इंटरनेटवरही असे व्हिडिओ अपलोड केले जातात, ज्यामुळे लोक बघतच राहतात. सध्या मेट्रो रेल्वेच्या एका प्रवाशाने आपल्या अफलातून कामगिरीनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये हा माणूस मेट्रोतून पळताना दिसतोय. हा व्हिडिओ 47 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेलाय, इंटरनेटवर हा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस मेट्रोसोबत रेस करत आहे. 1 मिनिट 37 सेकंदाचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत.

एक व्यक्ती मेट्रोतून खाली उतरते आणि धावायला लागते. ही व्यक्ती एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनकडे धावत जाते. मग दुसऱ्या स्टेशनवर पोहचल्यावर तो तीच ट्रेन पकडतो ज्या ट्रेनमधून तो धावत आलेला असतो.

विशेष म्हणजे हा माणूस ट्रेनच्या त्याच डब्यात चढतो जिथून तो पुढच्या स्टेशनसाठी धावला. लंडन मेट्रोमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय.

हा व्हिडिओ सर्वप्रथम पेपो जिमेनेझ नावाच्या युजरने मायक्रो ब्लॉगिंग साईटवर शेअर केला होता. अलिकडेच @ValaAfshar ते पुन्हा एकदा नावाच्या हँडलसोबत शेअर केलं होतं. युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी या ट्रेनमधून खाली उतरलो. पुढच्या स्टॉपच्या दिशेने धावत गेलो आणि मग त्याच ट्रेनमध्ये माझ्या स्वत:च्या सीटवर जाऊन बसलो.” याशिवाय हजारो लोकांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलीये.

एका युझरने कमेंट करत लिहिले की, “हा माणूस मेट्रोपेक्षा वेगवान निघाला. त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “खरोखर चकित करणारा व्हिडिओ. या माणसाने हे केले आहे यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.”

आणखी एका युझरने लिहिले की, “भावाचा स्टॅमिना अप्रतिम आहे. एकूणच या व्हिडिओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.