सोशल मीडिया ही इतकी अद्भुत गोष्ट आहे की, कधीही काहीही व्हायरल होऊ शकतं. 2 दिवस एक व्हिडीओ व्हायरल होत होता. वंशिका नावाच्या एका मुलीचा हा व्हिडीओ होता जिचं ब्रेकअप झालं होतं. ब्रेकअप झाल्यानंतर ही मुलगी तिच्या मैत्रिणीला फोन करते आणि सगळं जे झालं ते सांगते. तिची मैत्रीण हा फोन स्पीकरवर ठेवून त्याचा व्हिडीओ काढते आणि तो व्हिडीओ व्हायरल करते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. वांशिका यात सांगते की तिने का ब्रेकअप केलंय. आता याच वंशिकाच्या बॉयफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
आधी आपण पुन्हा तो व्हिडीओ बघुयात जो दोन दिवसांपासून व्हायरल होतोय
probably the funniest post-breakup crying session ?? pic.twitter.com/tkac4bbgxs
— isHaHaHa (@hajarkagalwa) December 8, 2022
लोक आता या व्हिडीओवर प्रचंड चर्चा करू लागलेत. दरम्यान, आता वंशिकाच्या आरोपांना तिचा प्रियकर आकाशने स्वतः उत्तर दिले आहे.
वंशिकाने तिचा एक्स बॉयफ्रेंड आकाशवर आरोप केला होता. त्याच शैलीत आकाशने उत्तर दिले आहे. हा किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
दोन महिन्यांच्या नात्यासाठी कुणी लग्नाची तयारी करत असेल तर मी काय करावं? असा आकाश या व्हायरल व्हिडिओमध्ये विचारतो.
बघुयात आकाशचा व्हायरल व्हिडीओ
Akaash ki side sunlo bhai ?? pic.twitter.com/97vGH8FBPA
— Chai-Shai (@aashishsarda07) December 9, 2022
इतकंच नाही तर आकाशने शॉपिंगपासून बिलपर्यंत सगळ्या विषयांवर चर्चा केली. ती म्हणाली की, मी गल्लीत मोमोज 20 रुपयांना खाते, पण ती मला 500 रुपयाचं बिल भरायला लावते आणि पैसे वाचवण्याबद्दल बोलते. ब्रेकअप तर होणारच होतं.