मुंबई: जुगाड! आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवाकोरा जुगाडचा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय. जुगाड तंत्रज्ञान हे भारतात सगळ्यात जास्त फेमस आहे. आपली लोकं इतकी हुशार असतात की ती नको तिथे वेळ, पैसा आणि त्यांची ऊर्जा वाया घालवत नाहीत. ते मधला मार्ग शोधतात. यासाठी ते सर्व प्रकारची शक्कल लढवण्यास तयार असतात. जुगाडचे व्हिडीओ लोकांना इतके आवडतात की यात मोठमोठ्या लोकांचा समावेश असतो. आनंद महिंद्रा स्वतः अशा प्रकारचे व्हिडीओ रिपोस्ट करताना दिसतात. हा जुगाड जास्तीत जास्त एखादं मशीन बनवण्यासाठीच केला जातो. हा जुगाड आपल्याकडे कुणीही करू शकतं. शिकलेला, न शिकलेला, कामगार, लहान मुलगा…अगदी कुणीही. जरा हटके विचार केला की जुगाड शक्य!
असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. सांगा बरं यात कोणता जुगाड असेल? हा जुगाड चक्क सीसीटीव्ही कॅमेरावर केलेला आहे. होय. तुम्ही कधी सीसीटीव्ही कॅमेरा 360 डिग्री फिरताना पाहिलंय का? या व्हिडीओ मध्ये हा कॅमेरा गोल-गोल, 360 डिग्री फिरतोय. याचा जुगाड एक नंबर केलेला आहे. या कॅमेराला टेबल फॅनची मोटार बसवली आहे. यामुळे तो कॅमेरा 360 डिग्री फिरतोय.
आता हा व्हिडीओ नीट बघा, असा सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही कधीच पाहिला नसेल. समजा असा कॅमेरा बनवायचा जरी असता तरी सुद्धा या कॅमेरासाठी खूप खूप खर्च आला असता. पण याला म्हणतात खरा जुगाड, ज्यात पैसा खर्च होत नाही. फक्त थोडं डोकं लावणं गरजेचं असतं. शक्कल लढवून या माणसाने फॅनची मोटार लावली त्यावर हा कॅमेरा बसवला आणि मग आता हा कॅमेरा फक्त टेबल फॅनच्या या मोटारमुळे 360 डिग्री फिरू शकतो. हा व्हिडीओ अनेकांना आवडलाय.