मुंबई : कोरोनाने (Corona Virus) अख्ख्या जगात हाहाकार माजवला. मात्र, कोरोनावरील लस (Corona Vaccine) आल्यापासून त्याचा धोका थोड्याप्रमाणात कमी झाला आहे. भारतातही कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह होती. मात्र, आज भारताने एक सुवर्ण इतिहास रचलाय, आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा (100 Crore Vaccination) आकडा पार केला आहे. आता याबाबतचा लसीकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. तुम्हीच पाहा काय आहे या व्हिडीओत –
? आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला, यामागे कदाचित याच लोकांची मेहनत असावी… #100CroreVaccination #gocoronago pic.twitter.com/6PzCf4xx3n
— Nupur Chilkulwar (@ChilkulwarNupur) October 21, 2021
या व्हिडीओमध्ये काही महिला हातात लस ठेवण्याचं सामान घेऊन गल्लीतून जात आहेत आणि चक्क भाजीवाले किंवा हातठेलेवाले ओरडतात तशा या महिला लस घेण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत. “कोरोना लसीचा घ्या पहिला डोज, दुसरा डोज”, असं म्हणत या महिला गावभर फिरताना दिसत आहेत. कोरोना लसीकरणाची ही अशी जनजागृती कदाचित आपण पहिल्यांदाच पाहात असाल. हा व्हिडीओ नेमका कुठलाय याबाबतची सध्या काहीही माहिती नाही.
भारतात कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार
देशामध्ये जवळपास गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाच्या केसेस कमी झाल्या आहेत आणि लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. आजचा दिवस भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज एक नवीन इतिहास भारताने रचला आहे. आज भारताने कोरोना लसीचा 100 कोटी डोसचा आकडा पार केला आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील RML हॉस्पिटलला भेट देखील देणार आहेत.
भारताने रचला इतिहास
एक नवा इतिहास रचून भारताने जगभरात आज डंका वाजवली आहे. या खास दिवशी लाल किल्ला संकुलात आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया हे ऐतिहासिक लसीकरणावरील गाणे आणि चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. याशिवाय देशातील विविध शहरांमध्ये भाजपचे मोठे नेते कार्यक्रमांचे आयोजन देखील करणार आहेत. भारत सरकारच्या कोविन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 100 कोटी डोस देण्यात आले आहेत.
भारताची ऐतिहासिक कामगिरी, 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण, जगभरात डंकाhttps://t.co/JzBzEYY0i8 | #COVID19 | #vaccination | #COVID19vaccination | #NarendraModi | #India | #celebrations | #100crorevaccination | #national |
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2021
संबंधित बातम्या :
फॉलोअर्सने प्रवृत्त केलं, सोशल मीडिया स्टारचा लाईव्हदरम्यान कीटनाशक प्यायल्याने मृत्यू
Kapil Dev | कपिल देव यांचा रणवीर सिंग लूक व्हायरल, चाहत्यांकडून मजेशीर कमेंट्स