इंटरनेटच्या जगात आपल्याला कधी काय मजेदार गोष्टी कधी पाहायला मिळतील, हे कुणालाच सांगता येत नाही. कधी कधी ते पोट धरुन हसवतात, तर काही व्हिडिओ असे असतात, जे पाहिल्यानंतर आपल्याचा धक्का बसतो. सोशल मीडियावर जुगाड बनवलेल्या गोष्टींचे व्हिडिओ लोकांना आवडतात. अशाच एका जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. हा टेक्नो जुगाड पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल व्वा! याला खरा जुगाड म्हणतात. (Viral Video of Desi jugaad amazing jugaad to lift cow dung without putting hands Farmers Trick Viral)
सोशल मीडियावर दररोज देसी जुगाडचे, काही व्हिडिओ तुम्ही पाहात असाल. जगात प्रतिभेची कमतरता नाही. जुगाड वापरून लोक मजेशीर गोष्टी करत राहतात. कधी कधी मोठे सेलिब्रिटीही त्यांचे अशा जुगाडी लोकांचे चाहते बनतात. याचंच एक ताजं उदाहरण आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. ज्यात शेतकऱ्याने जुगाड करून आपलं काम हलकं केलं आहे, खरं तर त्याने हातही न लावता जुगाड करून शेण उचललं आहे. शेतकऱ्याची ही ट्रिक सगळ्यांनाच आवडली आहे.
शेतकऱ्याला आपल्या गाई-म्हशींचे शेण दररोज अनेकदा साफ करावं लागतं. त्यासाठी त्यांना हातांचाच वापर करावा लागतो. मात्र एका शेतकऱ्याला याचा जुगाड सापडला आहे. आता शेणाला हातही न लावता ते उचलता येऊ शकतं हे यातून दिसतं. शेतकऱ्यांनी आता शेण उचलण्याचं उपकरण बनवलं आहे, जे लोकांना खूप आवडलं आहे.
व्हिडीओ पाहा:
देसी जुगाडचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. जुगाडू लाईफ हॅक नावाच्या अकाउंटवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना पेजच्या अॅडमिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शेण उचलण्याचं देसी जुगाडू मिशन’. या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले, अप्रतिम जुगाड आहे भावा. आणखी एका युजरने लिहिले, शेतकरी खूप हुशार आहे.
हेही पाहा: