लग्नात मुलीच्या बहिणींनी त्यांच्या दाजींचे बुटं चोरले नाहीत तर लग्न अर्धवट वाटतं. त्यामुळेच आपल्याकडे लग्नात बूट वा चप्पल चोरण्याची पद्धत आहे, यामध्ये एका मस्तीसोबत एका नव्या कुटुंबासोबत नातेसंबंध तयार कऱण्याचा प्रयत्नही केला जातो. नवऱ्याकडील लोक नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतात तर मुलीच्या बहिणी वा भाऊ आपल्या भाऊजींचे बूट चोरण्याचा शक्य तितका प्रयत्न करतात. बऱ्याचदा मुलीकडील लोक यशस्वी होतात आणि त्यानंतर बुटांच्या बदल्यात मुलीच्या बहिणी शगून म्हणजेच पैशांची मागणी करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हाच बूट चोरण्याचा प्रसंग दिसतो आहे. (Viral video of grooms brother and saali cute moment during joota churai rasam in wedding)
‘बूट चोरण्याच्या’ विधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वर एका विधीसाठी आपले शूज काढतो. शूज काढल्यानंतर ते आपल्या समोरच ठेवतो, तिथं वराचा भाऊ या शूजला चोरण्यापासून वाचवण्यासाठी उभा आहे. वराने शूज काढल्यानंतर तो ते व्यवस्थित ठेवतो. मात्र तितक्यात, वधू-वराच्या मागच्या बाजूने वधूची बहिण येते. आणि हळूच हात घालून ते शूज उचलते. वराचा भाऊ ते शूज वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण वधूची बहिण इतक्या शिताफीने शूज उचलते की वराच्या भावाला काहीही करता येत नाही.
आधी हा व्हिडीओ पाहा.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर wedabout नावाच्या एका पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा वधूच्या बहिणींची शूज चोरण्याच्या स्पर्धेची पूर्ण तयारी झालेली असते.’ दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिले आहे, भाऊ शूज घालू नका.
तसं पाहायला गेलं तर, वेगवेगळ्या समाजात आणि वेगवेगळ्या प्रदेशात लग्नाचे विधी देखील वेगवेगळे असतात. पण ‘शूज चोरणे’ हा विधी असा आहे की जर तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तर तुम्हाला हा विधी तिथे पाहायला मिळेल. या विधीमध्ये वर आणि मेव्हणी यांच्यात गोड भांडण होतं. या दरम्यान, मेव्हणी तिच्या दाजींकडे शूजच्या बदल्यात पैशाची मागणी करते.
‘बूट चोरण्याच्या’ विधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये वर एका विधीसाठी आपले शूज काढतो. शूज काढल्यानंतर ते आपल्या समोरच ठेवतो, तिथं वराचा भाऊ या शूजला चोरण्यापासून वाचवण्यासाठी उभा आहे.
हेही पाहा: