लहान मुले असो वा प्राणी, ते लहान असताना खूप गोंडस दिसतात. त्याची कृत्यं, त्याचा धिंगाणा पाहण्यासारखा असतो. तुम्हाला सोशल मीडियावर तुम्हाला लहान मुलांचे किंवा प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात, त्यातील काही खूप मजेदार आणि हसवणारे असतात. तर काही इतके भावूक करणारे आणि डोळ्यातून पाणीही आणणारेही असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये गंमतीसोबतच काही आश्चर्यकारक गोष्टीही आहेत. हा व्हिडिओ सिंहाचा छावा आणि दोन चिंपांझीच्या पिल्लांचा आहे. (Viral Video of Little lion frightens chimpanzee baby Cute video)
खरं तर सिंहांना जंगलाचा राजा म्हटले जातं. सिंह लहान असला तरी, त्यांच्या भीतीने संपूर्ण जंगल हादरतं. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, असंच दृश्यं दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, सिंहाचा एक पाळिव छावा फिरताना दिसतोय, त्याच्यासमोर एक जण चिंपाझीची पिलं सोडतो, त्यानंतर जे होतं, ते तुम्हाला खूप हसवेल.
व्हिडीओ पाहा:
जेव्हा चिंपांझींच्या पिलांना या सिंहाच्या पिलासमोर सोडलं जातं, तेव्हा चिंपांझीची पिलं खूप घाबरतात. त्यांना वाटतं की, हे सिंहाचं पिल्लू त्यांच्यावर हल्ला करेल, याच भितीने आधी चिंपाझींचं एक पिल्लू त्याला हाताने मारतं, त्यानंतरही सिंहाचं पिल्लू ऐकत नाही. त्यानंतर चिंपाझींचे एक पिल्लू दुसऱ्याला चिटकून बसतं. यानंतर ते दोघेही एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून सिंह त्यांचे काहीही नुकसान करू शकत नाही.
हा व्हिडिओ खूप मजेदार आहे, ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. हा मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर wonderfuldixe नावाच्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. तो आतापर्यंत 1 लाख 16 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.
हेही पाहा: