व्हिडीओ बघून लोक म्हणाले,”केजरीवाल काय विकताय?”

| Updated on: Feb 04, 2023 | 10:50 AM

एका युजरने मजेशीर पद्धतीने कमेंटमध्ये 'मफलर कुठे आहे', असा प्रश्न विचारला आहे, तर दुसरा युजर आश्चर्याने विचारत आहे की 'अरे केजरीवाल काय विकत आहे'.

व्हिडीओ बघून लोक म्हणाले,केजरीवाल काय विकताय?
exactly looks like arvind kejriwal
Image Credit source: Social Media
Follow us on

जगात एकाच रूपाची दोन माणसे असू शकत नाहीत, असे सर्वसाधारणपणे मानले जात असले तरी असे अनेक लोक आहेत ज्यांचे रूप एकमेकांसारखे दिसतात. कोण खरे आणि कोण खोटे हे ओळखणे अवघड होऊन बसते. विशेषत: फिल्म स्टार्ससारखे दिसणारे लोक खूप असतात. मग तो गोविंदा असो किंवा अजय देवगण किंवा सलमान खान. सोशल मीडियावर अनेकदा त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या लोकांचे फोटो व्हायरल होत असतात. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा हमशकल तुम्ही कधी पाहिला आहे का? होय, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचा हमशकल रस्त्याच्या कडेला चाट विकताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रुपात एक व्यक्ती चाट विकताना दिसत आहे. इथे अनेक प्रकारच्या चाट उपलब्ध आहेत. याशिवाय ते समोसा विकतानाही दिसतात. एका फूड ब्लॉगरने या व्यक्तीचा व्हिडिओ बनवलाय. या व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांच्यासारखेच कपडे परिधान केले असून टोपी आणि चष्माही घातला असल्याचे दिसून येत आहे. या व्यक्तीला पाहून सगळेच फसतायत. प्रथमदर्शनी कुणाचीही फसवणूक होईल अशी ही व्यक्ती आहे.


एका युजरने मजेशीर पद्धतीने कमेंटमध्ये ‘मफलर कुठे आहे’, असा प्रश्न विचारला आहे, तर दुसरा युजर आश्चर्याने विचारत आहे की ‘अरे केजरीवाल काय विकत आहे’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘तुम्ही स्वस्त देत आहात पण केजरीवाल फुकट देत आहात’.