मुंबई: सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये आता हे प्लॅटफॉर्म्स असतात. रोज या प्लॅटफॉर्म्स वर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात.प्राणी, पक्षी, लहान मुले, मिम्स असं काय नको नको ते या सोशल मीडियावर व्हायरल होत असतं. बरं आता हे व्हिडीओ एकीकडे आणि मेट्रो मधील व्हायरल व्हिडीओ एकीकडे. तुम्हाला तर मेट्रो मधील व्हिडीओ माहीतच असतील. एकसे बढकर एक व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोक हे व्हिडीओ शेअर सुद्धा करतात. हा व्हिडीओ सुद्धा मेट्रोचाच आहे. व्हिडीओ बघून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. लोकं कधी काय करतील याचा खरंच नेम नसतो. हा व्हिडीओ तर तुफान आहे.
या व्हिडीओ मध्ये दोनजण एक मोठा, जम्बो सोफा उचलताना दिसतायत. ठिकाण आहे मेट्रो स्टेशन! होय. हे दोघे चक्क मेट्रो स्टेशनवर हा भलामोठा सोफा उचलताना दिसतायत. व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्यालाही प्रश्न पडतो हा सोफा नेमका चाललाय कुठे? मग मेट्रो येते. मेट्रो आली की आपल्याला वाटतं आता हे दोघे हा जम्बो सोफा घेऊन या ट्रेन मध्ये बसतील. मेट्रो येते, ही दोन माणसे सोफा उचलतात आणि तो मेट्रो मध्ये व्यवस्थित नेता यावा यासाठी तो उभा करतात. असं केल्याने सोफा आरामात त्या मेट्रोमध्ये घुसतो. पण तितक्यात जे होतं ते आपल्या कल्पनेपलीकडे आहे. ही दोन माणसे जसा हा सोफा घेऊन ट्रेन मध्ये चढतात तसे ते दुसऱ्या दरवाजाने दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बाहेर पडतात.
एका दरवाज्यातून ते त्या मेट्रोमध्ये सोफा घेऊन जातात आणि दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर पडतात. मग हे बघून आपल्या लक्षात येतं की त्यांना सोफा घेऊन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचं असतं. आपण व्हिडीओच्या सुरुवातीला काहीतरी वेगळंच इमॅजिन करतो आणि होताना मात्र काहीतरी वेगळंच होतं. आपल्याला वाटतं फार तर फार काय होईल? हे दोघे सोफा घेऊन मेट्रो मध्ये बसतील. पण प्रत्यक्षात तर त्यांना प्लॅटफॉर्म बदलायचा असतो. एवढा मोठा सोफा घेऊन चालत कसं जाणार म्हणून ते मेट्रोची वाट बघत असतात, ती आली की ते त्यांचं काम करून घेतात. हा व्हिडीओ तुम्ही पुन्हा-पुन्हा बघाल.