पाकिस्तानची चपात्या बनवणारी ती सुंदर मुलगी आठवते का? जिने आपल्या गोड हसण्याने जगाचं मन जिंकून घेतलं होतं, आणि सोशल मीडियावर धूमाकूळ घातला होता. त्या मुलीचं नाव होतं अमिना रियाझ. विनामेकअप आणि कुठल्याही स्टाईलशिवाय, तिच्या सुंदरतेची कुठलीही सीमा नव्हती. याच अमिनाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता अमिनाचा नवा व्हिडीओ समोर आले आहे, ज्यात ती बटाटे कापताना दिसत आहे. (Viral Video of Pakistan roti making girl Amina Riyaz slices potato in a new viral video netizens loved it)
15 वर्षांची अमिना पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराचीच्या दुर्गम भागात राहते. ती भटक्या विमुक्त कुटुंबातील असून, अतिशय साधं जीवन जगत आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलाने तिचा हा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला, जो इंटरनेटवर आगीसारखा पसरला.
आता अमीनाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये ही पाकिस्तानी मुलगी स्माईल करत बटाटे कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळेच अमीनाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.
हा व्हिडिओ पाहूया.
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर aamu_5 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 10 सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता, मात्र आता तो व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिनने बहुरंगी सलवार सूट घातला आहे. ती हसत हसत बटाटे कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, दुसरी मुलगी त्याला बटाटे कापण्यास मदत करत आहे, परंतु क्लिपमध्ये ती क्वचितच दिसते.
हा व्हिडीओ लोकांना किती आवडला आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, आतापर्यंत सुमारे 80 हजार लोकांनी याला लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर शेकडो लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकजण याला मुलीच्या सौंदर्यचे कौतुक करत आहे, तर कोणी अमीनाला सांगत आहे की, तू माझ्याशी लग्न करशील. एकूणच या पाकिस्तानी मुलीने आपल्या साधेपणाने आणि गोड हास्याने लोकांना घायाळ केले आहे.
हेही पाहा: