आज नाताळ (Christmas) आहे. हा विशेष सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतात जसा दिवाळी(Diwali)चा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसाच ख्रिसमस(Christmas)ही. विशेषत: या दिवशी ते ख्रिसमस ट्री सजवतात आणि त्याच वेळी घर इत्यादी दिवे लावून सजवतात. जर तुम्ही फक्त घरातच नाही तर रेस्टॉरंट वगैरेमध्ये गेलात तर तुम्हाला ख्रिसमस ट्रीदेखील दिसतील आणि संपूर्ण रेस्टॉरंट वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांनी उजळून निघालेलं असतं. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी या खास प्रसंगी एक अतिशय सुंदर व्हिडिओ व्हायरल होतोय, यामध्ये एक ट्रेन पूर्णपणे ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलीय. हे ‘अद्भुत’ दृश्य लोकांना खूप आवडलंय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की एक ट्रेन आधीच रुळावर उभी आहे आणि एक ट्रेन लगतच्या रुळावर येत आहे, ते पाहून असं दिसतं, की त्या ट्रेनला आग लागलीय आणि ती न थांबता जळतेय. खरं तर ही एक वाफेच्या इंजिनाची ट्रेन आहे, जी पूर्णपणे ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलेलीए आणि म्हणूनच ट्रेनकडे पाहिल्यावर असं वाटतं, की तिला आग लागलीय आणि धूर निघतोय.
हा नेत्रदीपक व्हिडिओ आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलाय आणि कॅप्शन लिहिलंय, ‘ख्रिसमसच्या दिव्यांनी सजलेली वाफेची लोकोमोटिव्ह ट्रेन’. हा व्हिडिओ कुठला आहे, हेही त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितलंय. त्यांच्या मते हे विहंगम दृश्य हॅम्पशायर, UKचं आहे.
A steam engine train decorated with Christmas lights
Hampshire, UK
?️ Web @pareekhjain pic.twitter.com/Vz3Kyl46IN
— Dr. M V Rao, IAS (@mvraoforindia) December 24, 2021
हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला. तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलंय. त्याचबरोबर अनेकांनी या व्हिडिओवर उत्तम कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलंय, ‘सर खूप सुंदर’, तर दुसऱ्या यूजरनं लिहिलंय, ‘खूप छान! अद्भुत’. त्याचप्रमाणे आणखी एका युजरनं ‘मला वाटलं, की हा हॅरी पॉटरचा सीन आहे’, अशा कमेंट्स केल्यात.