Viral Video: पालकांना खबरच नाही आपले पाल्य “हवा” करतायत! गाडीच्या टपावर बसून शाळेत, व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Aug 31, 2022 | 12:13 PM

व्हिडिओ पाहून सगळेच संतापलेत, रिक्षाचालकाला तर नेटकरी कमेंट्स मध्येच सुनावतायत. अतिशय भयानक असा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Viral Video: पालकांना खबरच नाही आपले पाल्य हवा करतायत! गाडीच्या टपावर बसून शाळेत, व्हिडीओ व्हायरल
Viral Video Of School Students
Image Credit source: Social Media
Follow us on

मुले वेळेवर आणि सुरक्षितपणे शाळेत पोहोचतील, असा विचार करून पालक आपल्या मुलांना बस, व्हॅन किंवा ऑटोमधून शाळेत (School Van) पाठवतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून स्कूल बस बद्दलचे तुमचे विचारच बदलतील. खरंतर व्हायरल क्लिपमध्ये काही शाळकरी मुलं (School Stundets) ऑटो रिक्षाच्या छतावर बसलेली दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून हा असा प्रवास मुलांसाठी किती घातक आहे ते कळतं. घरी पालक निवांत असतात आणि पाल्य रिक्षाच्या छतावरून शाळेत जात असतात. उत्तर प्रदेशातील बरेली येथून हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जातंय. जो पाहून सगळेच संतापलेत, रिक्षाचालकाला (Auto Driver) तर नेटकरी कमेंट्स मध्येच सुनावतायत.

व्हायरल क्लिप

अतिशय भयानक असा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. व्हायरल क्लिपमध्ये तीन शाळकरी मुलं चालत्या ऑटो रिक्षाच्या छतावर बसलेली दिसतात. या मुलांचे वय 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान असल्याचे दिसते. हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या फोनवर रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी चालकावर निष्काळजीपणा आणि निष्पापांच्या जीवाला धोका असल्याची जोरदार टीका करतोय.

व्हिडिओ

तात्काळ कारवाई

हा व्हिडिओ राजकुमार नावाच्या युझरने ट्विटरवर शेअर केला आहे. युजरने लिहिले आहे की, “अशा बेदरकार ऑटो चालकासोबत कोणीही आपल्या मुलांना शाळेत कसे पाठवू शकतो?” युझरने लिहिले की, “गेल्या शुक्रवारी या ऑटोने आरटीओ, पोलीस चौकी ओलांडली पण सर्वजण झोपले होते. रिक्षाचालकाच्या निष्काळजीपणावर कोणतीही कारवाई झाली नाही. यासोबतच युझरने यूपी पोलिसांनाही टॅग केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हिडिओ व्हायरल होताच बरेली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.