मुंबई : असं म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घ्यावा. पण कधी तुम्ही कुठल्या चोराला देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करताना पाहिलंय का? नसेल बघितलं तर हा व्हिडीओ नक्की पाहा. सध्या असाच एक व्हिडीओ शेअर होत आहे. हे प्रकरण महाराष्ट्रातील ठाण्यातील नौपाडा येथील आहे. ज्याला पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा चोर आदर्शवादी आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेजचा आहे, ज्यामध्ये एक चोर मंदिरातील दानपेटी चोरताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मंदिरात प्रवेश करुन इकडे-तिकडे पाहतो, त्यानंतर देवाच्या चरणांना स्पर्श करतो आणि नंतर मंदिरात ठेवलेली दानपेटी घेऊन पळून जातो. फुटेजमध्ये आणखी एक साथीदारही मंदिराबाहेर थांबल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी मंदिरातून बाहेर गेले असताना ही चोरी झाली असून ते परत आले असता पुतळ्यासमोरील दानपेटी गायब होती. दानपेटीत एक हजार रुपये असल्याचे पंडित यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ –
30 सेकंदाचा हा व्हिडीओ फेसबुकवर Rationalist नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, ‘दानपेटी चोरण्यापूर्वी चोराने देवाच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श केला..!’ या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मला तर हा चोर मोठ्या तत्त्वांचा वाटत आहे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘हा चोर चोरी करण्यापूर्वी माफी मागत आहे, नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी मजबुरी असेल म्हणून तो मंदिरातून पैसे चोरत आहे’
याबाबत नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ही चोरी मंदिरातील एका स्थानिक व्यक्तीने केली आहे. कारण केवळ एका स्थानिक व्यक्तीलाच हे चांगले ठाऊक असते की, कोणत्या वेळी मंदिरात कोण असते. सध्या सीसीटीव्ही फुटेजमधील छायाचित्रे मोठ्या संख्येने स्थानिक लोकांना दाखवण्यात आली. त्यामुळे आम्हाला संशयितांच्या ओळखीबाबत अनेक सुगावा मिळाले. त्याआधारे पोलिसांनी राबोडी येथील केजस म्हसदे (वय 18) याला अटक केली. त्याने त्याच्या सहकाऱ्याची ओळख सांगितली आणि आता त्यालाही अटक करण्यात आली आहे.
लोभी चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हा तर मानवांसाठी एक खास संदेश https://t.co/9U5gZydymW #Chimpanzee #ViralVideo
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021
संबंधित बातम्या :
Video: पाठवणीवेळी रडण्याचा आईचा आग्रह, वधूला मेकअप खराब होण्याची चिंता, पाहा भन्नाट व्हिडीओ