इंटरनेटवर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात शेअरिंगचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. एखादी गोष्ट वाटून खाणं किती महत्त्वाचं असतं आणि त्यात किती प्रेम असतं हेच यातून दिसतं आहे. (Viral video of two cat who share his food and teach a lesson of sharing is caring)
व्हिडिओमध्ये दोन पाळीव मांजरी दिसत आहेत, ज्या एकमेकींसोबत जेवण वाटून घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांना त्यांचे शाळेतले दिवस आठवले असतील, जेव्हा ते मित्रांसोबत डबा वाटून खायचे. लोकांना हा गोंडस व्हिडिओ खूप आवडत आहे.
पाहा व्हिडीओ:
Sharing is caring, even in reverse.. ? pic.twitter.com/eGkB9epRrx
— Buitengebieden (@buitengebieden_) October 6, 2021
मांजरींनी शिकवला ‘शेअरिंग इज केअरिंग’ चा धडा
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की, दोन मांजरी एका भांड्यात काहीतरी खात आहेत. यांच्याजाई इतर कुणी असतं, तर खाण्यासाठी भांडलं असतं, वा जो बलवान असता त्याने ते जेवण हिसकावून घेतलं असतं, मात्र इथं थोडं खाऊन झाल्यावर पहिली मांजर ती वाटी दुसऱ्या मांजरीकडे सरकवते, दुसरी त्यातून खाते आणि ती वाटी पुन्हा पहिल्या मांजरीकडे सरकवते. या दोन्ही मांजरींचं असंच जेवण सुरु राहतं. मांजरीला स्वार्थी म्हटलं जातं, पण इथं मांजरींच्या समजदारपणाचं दर्शन घडतं.
मांजरींची ही गोंडस कृती सोशल मीडियावर खूप गाजते आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडलेला दिसत आहे. आपण धावपळीच्या जीवनात सध्या नैतिक मूल्य विसरत चाललो आहोत, माणुसकी विसरत आहोत, तीच जाणीव हा व्हिडीओ करुन देतो. आणि सध्या जगाला शेअरिंग आणि केअरिंगची गरज असल्याचं सांगतो.
हा गोंडस व्हिडिओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शन लिहिले की, ‘शेअरिंग इज केअरिंग.’ बातमी लिहीपर्यंत या व्हिडिओला 4 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
हेही पाहा: