नवी दिल्ली: सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हीडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही मजेशीर व्हीडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाही. तर काही व्हीडिओ प्रेक्षकांना धक्का देणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दोन महिला एका शेतात फ्रीस्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत.
हा मारामारीचा व्हीडिओ असला तरी तो पाहून अंगावर काटा येण्यापेक्षा हसायलचा जास्त येईल. व्हीडिओत शेताचा परिसर दिसत आहे. याठिकाणी एका खाटेवर महिलांची हाणामारी सुरु असल्याचे दिसत आहे. दोन्ही महिला एकमेकींना खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हीडिओ पाहता ही हाणामारी गंभीर नसून मस्करीत सुरु असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जवळच उभ्या असलेल्या एकाने मोबाईलवर हा व्हीडिओ शुट करून व्हायरल केला आहे.
Video | ‘बुलेट बंदी’ गाण्यावर नर्स थिरकली, भन्नाट डान्सवर नेटिझन्स फिदा
younglandlord01 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. तेव्हापासून नेटकऱ्यांमध्ये या व्हीडिओची प्रचंड चर्चा आहे. या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.
संबंधित बातम्या:
Video | बर्थडे सेलिब्रेशनसाठी तरुणी रुसली, समजूत काढताना बॉयफ्रेंडने हात टेकले, व्हिडीओ पाहाच !